SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सवलतीत एसटी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ..!

एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार २९ सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत तिकिट दरात सवलत देण्यात येते.. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने जून-२०१९ मध्ये संबंधित लाभार्थींसाठी आधार क्रमांकाशी निगडीत ‘स्मार्ट कार्ड’ योजना सुरु केली होती…

एसटीच्या प्रत्येक आगारातून ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती.. मात्र, नंतर कोरोना संकट आले नि सारे काही ठप्प झाले.. एसटीचे चाक जागीच थांबले.. त्यामुळे या योजनेची प्रक्रियाही बंद पडली..

Advertisement

‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ
सरकारने नंतर ‘स्मार्ट कार्ड’ योजनेसाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, नंतर कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. अशा परिस्थितीत प्रवाशांना एसटी आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे, किंवा त्यासंबंधीची माहिती प्रत्यक्ष देता येणे शक्य नाही..

ही बाब लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या योजनेला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिलीय. एसटीतून सवलतीत प्रवासासाठी 1 एप्रिल 2022 पासून ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक असेल. त्यामुळे या मुदतवाढीचा लाभ घेऊन लाभार्थांनी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री परब यांनी केले आहे..

Advertisement

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर एसटीच्या प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement