SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोलचे दर पुन्हा एकदा कमी होणार..? मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय..!

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी, तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते..

मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतरही पेट्रोल दर शंभरी पारच आहेत. काही राज्यांनीही कर कमी केले होते. मात्र, त्यानंतरही सामान्य नागरिकांना फारसा दिलासा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर पुन्हा एकदा कमी होऊ शकतात..

Advertisement

पेट्रोलचे दर कसे कमी होणार..?
मोदी सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील वस्तू व सेवाकर (GST) 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला असल्याची माहिती पेट्रोल व नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली…

तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तत्कालिन केंद्र सरकारने 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमास गती देण्यासाठी मोदी सरकारने पेट्रोलमध्ये मिक्स केल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील ‘जीएसटी’त 13 टक्क्यांची कपात केली आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात सरकारने पेट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत लिटरमागे 1.47 रुपयांनी वाढ केली होती. इथेनॉलच्या अधिक वापरामुळे पेट्रोलवरील भार कमी होण्याची आशा आहे. पेट्रोल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात खर्चही कमी होऊ शकतो..

केंद्र सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढलंय. 2013-14 मध्ये 38 कोटी लिटर असणारा इथेनॉल पुरवठ्यात 2020-21 मध्ये 350 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली आहे.

Advertisement

‘ईबीपी’ कार्यक्रमा अंतर्गत, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जाते. इथेनाॅलवरील करात कपात केल्याने पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात.. तसेच इथेनॉल निर्मितीमुळे अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांनाही मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याचे सांगण्यात आले..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement