SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेपरफुटी प्रकरणी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! आता सरकारी नोकरभरती ‘या’ नामांकित कंपन्यांकडे..

राज्यात इथे पेपरफुटी झाली आणि तिथे कॉपी प्रकरण घडलं! असं गेल्या महिन्याभरात बहुतेकदा ऐकायला मिळालं. यामध्येच म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमधील परीक्षेसंबंधी गोंधळ उडाल्याचे पडसाद बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या जी बैठक झाली त्यात उमटले.

नोकरभरती आता नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून..!

Advertisement

राज्यातील भरती प्रक्रिया आणि महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याने यानंतरील राज्य सरकारच्या नोकरभरतीची परीक्षा पुढील काळामध्ये नामांकित एमकेसीएल म्हणजेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL), आयबीपीएस – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) किंवा टीसीएस – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटी असली काय आणि म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ असला काय, एकंदरच सरकारी नोकरभरतीमधील ही प्रक्रिया व परीक्षांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागच्या काही वर्षात भाजप सरकारने त्यांच्या काळात हवं तसं खासगी कंपन्यांना भरती प्रक्रियेसाठी नेमलं आणि यानंतर आता मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे, असं अनेकांचं मत आलं. आता भाजपवर काही मंडळी टीका करत असून सध्या ही पद्धत बदलायचं काम चालू झालं आहे.

Advertisement

म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता, व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक विधी सल्लागार अशा विविध 565 विविध रिक्त जागांसाठी मागील रविवारी परीक्षा घेण्यात येणार होती. पण या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे जाहीर केला होता. वेगवेगक्या स्तरातून प्रतिक्रिया आणि तीव्र नाराजी व्यक्त होत असताना जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, उदय सामंत यांनीही या विषयावर नाराजी व्यक्त केली.

सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याचं मंत्र्यांचं मत आहे. मागील सरकारच्या काळात सरकारी नोकरभरतीसाठी वाट्टेल तशी खासगी कंपन्यांची निवड केल्याने ही वेळ आल्याचा मुद्दा काही मंत्र्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भरती प्रक्रियेतील या गोंधळाबाबत मंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमती दर्शवली. भरती प्रक्रिया व महाविकास आघाडी सरकारविरोधात या प्रकरणांमधून त्यातून नाराजी निर्माण होत आहे. म्हणून यानंतर यापुढे परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी या कंपन्यांची निवड केली गेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement