SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

मुलगी म्हणजे ‘परक्या घरचे धन..’ अशी एक विचारधारा आहे.. त्यामुळे मुलीच्या जन्मापासूनच आई-वडिलांना तिच्या लग्नाचे टेन्शन येते. बऱ्याचदा मुलीचे शिक्षण अर्धवट सोडून तिच्या लग्नाचा बार उडवून देतात. ग्रामीण भागात आजही बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे..

मुलींचे बालविवाह टाळण्यासाठी 1955चा विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यानुसार (Hindu Marriage Act) लग्नासाठी मुलीचे वय 18 वर्षे, तर मुलाचे वय 21 वर्षे करण्यात आले आहे. मात्र, मोदी सरकार आता त्यात बदल करण्याच्या विचारात आहे..

Advertisement

मुलींच्या लग्नाचे वय आता १८ वरून २१ वर्षे केले जाणार आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. 15) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘मुलींना कुपोषणापासून वाचविण्यासाठी त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले होते.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर डिसेंबर-2020 मध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ (Task Force) नेमण्यात आले. ‘मातृत्वासाठी वय, माता मृत्यू दर कमी करण्याची गरज, पोषण सुधारणा’ आदी गोष्टींचा अभ्यास करुन टास्क फोर्सने नीती (NITI) आयोगाकडे अहवाल सादर केला..

याबाबत जया जेटली म्हणाल्या, की “टास्क फोर्सच्या शिफारशींमध्ये लोकसंख्येचा मुद्दा कधीच नव्हता. सध्या तसाही देशाचा प्रजनन दर कमी होत असून, लोकसंख्या नियंत्रणात आहे. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यामागे महिला सक्षमीकरणाचा विचार आहे…!”

Advertisement

टास्क फोर्सने केलेल्या शिफारशी
– मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्याचा निर्णय लोकांनी सहज स्वीकारावा, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी.
– दुर्गम भागांतील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी वाहतुकीची सोय, मुलींसाठी शाळा आणि विद्यापीठांमध्ये सहज प्रवेश मिळावा..

– शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाला औपचारिकपणे जागा दिली जावी.
– पॉलिटेक्निक संस्थांमधील महिलांचे प्रशिक्षण, कौशल्य व व्यावसायिक प्रशिक्षण आणि महिलांची कमाई वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे.

Advertisement

– मुलींनी पैसा कमाविण्याची योग्यता सिद्ध केल्यास त्यांचे लग्न करण्यापूर्वी आई-वडील नक्की विचार करतील, असे शिफारशींमध्ये म्हटले आहे.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement