SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कंपनीच्या स्कूटर्स एकदा चार्ज केल्या की भन्नाट धावणार, तुम्हीही बुकिंग केली असेल, तर मग वाचा..

भारतात चर्चा असणारी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 व Ola S1 Pro (Ola electric scooters) ची ग्राहकांना प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात होणार आहे. या स्कूटरची बुकिंग याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झाली होती. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओला एस1, एस1 प्रो गाड्यांची डिलिव्हरी आजपासून म्हणजे 15 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार असल्याची ‘गड्डी निकल चुकी’ या कॅप्शनसह एक व्हिडिओ ट्विट करून माहिती दिली आहे.
ओला एस 1 आणि ओला S1 प्रो बद्दल…
▪️ ओला कंपनीने ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केल्या आहेत. ओला एस 1 ची किंमत सबसिडीसह महाराष्ट्रात 94 हजार 999 रुपये तर ओला एस 1 प्रोची किंमत महाराष्ट्रात 1 लाख 24 हजार 999 रुपये करण्यात आली आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
भविष्यात महत्वाच्या माहीतीसाठी ओलाच्या अधिकृत वेबसाईटला अधूनमधून भेट देत राहा, लिंक: https://book.olaelectric.com/selectVariant
बॅटरी फुल चार्ज केल्यावर…
Ola S1 मध्ये 2.98 किलोवॅट बॅटरी पॅक असून OLA S1 एकदा फुल चार्ज केल्यावर 120 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. याचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे, असं कंपनीच्या वेबसाईटवर स्पष्ट उल्लेख आहे.
Ola S1 Pro स्कूटरमध्ये 3.97 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6.30 तास लागतात. ओला S1 प्रो एका चार्जमध्ये 180 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते. याचा टॉप स्पीड ताशी 115 किमी आहे.
कंपनीचा दावा आहे की, Ola S1 Pro ची बॅटरी 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. बॅटरी निम्म्यापर्यंत चार्ज केली, तरी ही स्कूटर 75 किमीपर्यंतचं अंतर पार करू शकते.
Ola S1 स्कूटरची 15 डिसेंबर म्हणजेच आजपासूनच डिलीव्हरी सुरू होणार आहे. भाविश अग्रवाल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केली असून, त्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये डिलीव्हरीसाठी तयार होत असल्याचं दिसतं आहे. तमिळनाडूमध्ये कंपनीच्या फ्यूचर फॅक्ट्रीमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065