SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📱 आता फक्त 1 रुपयात रिचार्ज! तुम्हीही जिओचं सिम वापरताय? मग वाचा..

💁🏻‍♂️ देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ कंपनीने सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत फक्त ‘1 रुपया’ आहे. तुम्हाला या प्लॅनचा फायदा खास My Jio अ‍ॅपवर घेता येणार आहे. वेब सर्चवर हा प्लॅन दिसत नाही. जिओने आकर्षक 1 रुपयाचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे.

1️⃣ रिलायन्स जिओचा 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Advertisement

📳 जिओच्या 1 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबी हायस्पीड डेटा मिळतो. प्लॅनमध्ये 100 एमबी डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 60 kbps होईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्लॅनचा सिम सुरू ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

▪️My jio (माय जिओ) अ‍ॅपवर Mobile या पर्यायावर क्लिक करा.
▪️ यानंतर खाली तुमचा जिओ नंबर दिसेल तिथे पुढे Recharge वर क्लिक करा.
▪️ आता पुढे सर्व रिचार्ज प्लॅन्स तुम्हाला दिसतील.
▪️ तेथे सर्वात शेवटी Value या पर्यायावर क्लिक करा.
▪️ मग सर्वात खाली Other Plans वर क्लिक करा आणि मग 1 रुपयांचा रिचार्ज करा.

Advertisement

👉 जिओचा 1 रुपयांचा रिचार्ज भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन झाला आहे. एअरटेलशिवाय वोडाफोन आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून 1 रुपयांचा रिचार्ज केला जातो.

📍 भारतात एक रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकते. जिओकडे 1 रुपयांसह 10 आणि 20 रुपयांच्या किंमतीचा टॉप-अप प्लॅनही आहे. 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॅलिडिटीसह 7.47 रुपये टॉक-टाईम मिळतो. तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॅलिडिटीसह 14.95 रुपये टॉकटाईम मिळते.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement