SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नव्या ठिकाणी गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचंय..? ‘नो टेन्शन’ फक्त या स्टेप्स फाॅलो करा…!

नोकरी-व्यवसाय, कामानिमित्त अनेकांना वारंवार आपले राहते ठिकाण बदलण्याची वेळ येते. नव्या शहरात प्रत्येक गोष्ट पहिल्यापासून सुरु करावी लागते. नव्या शहरात अगदी घर शोधण्यापासून ते शिप्ट हाेईपर्यंत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो..

नव्या शहरात जाताना, सर्वात मोठी समस्या समोर येते, ती म्हणजे नव्या ठिकाणी ‘गॅस कनेक्शन’ कसे ट्रान्सफर करायचे..? पण टेन्शन घेऊ नका. अगदी सोप्या पद्धतीने नव्या ठिकाणी गॅस कनेक्शन मिळू शकते. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

गॅस कनेक्शन कसे ट्रान्सफर करायचे..?
गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी सर्वप्रथम सध्याच्या (जुन्या शहरातील) गॅस एजन्सीमध्ये जा. तेथे गॅस रेग्युलेटर नि सिलिंडर जमा करावे लागेल. या दोन्ही गोष्टी गॅस एजन्सीमध्ये जमा केल्यावर गॅस एजन्सीकडून तुम्हाला तुमचे ‘डिपॉझिट’ परत मिळेल.

नंतर गॅस एजन्सीकडून तुम्हाला फॉर्म देण्यात येतो. त्यावर तुमचे गॅस कनेक्शन कोणत्या गावात, शहरात ट्रान्सफर केलेय, त्याचा उल्लेख असतो. या फॉर्मवरच नव्या ठिकाणी ‘गॅस कनेक्शन’ मिळते. त्यामुळे हा फाॅर्म सांभाळून ठेवा. फॉर्म हरवल्यास पुन्हा नवे कनेक्शन घ्यावे लागू शकते.

Advertisement

नव्या ठिकाणी हे करा..
ज्या शहरात गॅस कनेक्शन घेणार आहात, तेथे गेल्यावर घराजवळील गॅस एजन्सीशी संपर्क साधा. जुन्या ठिकाणच्या एजन्सीतून देण्यात आलेला फॉर्म तेथे दाखवा. नंतर नव्या गॅस एजन्सीमध्ये पुन्हा डिपाॅझिट भरावे लागेल.. डिपॉझिट जमा करताच, तुम्हाला गॅसचे नवे कनेक्शन मिळेल.

अशा प्रकारे अगदी सहज, सोप्या पद्धतीने देशभरात कुठेही तुम्हाला गॅस कनेक्शन सहज ट्रान्सफर करता येते. गॅस कनेक्शन ट्रान्सफर करताना, फक्त एकच काळजी घ्या, ती म्हणजे गॅस एजन्सी घराजवळची पाहा.. कारण एजन्सी घराजवळ असल्यास तातडीने गॅस सिलिंडरची डिलिव्हरी होते…

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement