महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ उभारणीसाठी राज्य शासनाने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत एकूण 250 कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कांदा चाळ उभारणी प्रकल्प आणि निधी:
▪️ राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 62.50 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणी प्रकल्प सन 2021-22 व 2022-23 मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
▪️ सदर प्रकल्पांतर्गत एकूण 250 कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. 125 कोटी निधी दोन वर्षांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
▪️ राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीने सन 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 125 कोटी नियतवाटप मंजूर केलेले आहे. आता सदर प्रकल्प सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी शिल्लक 62.50 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकल्प 50:50 या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रू.62.50 कोटी निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065