SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्रिय मंत्र्यांचा तोल ढासळला..! प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ, अंगावर धावून जात हात उगारला..

मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दीर्घ काळ आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन सुरु असताना, उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात कार घुसवून अनेकांना चिरडण्यात आले होते. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ४ शेतकरी व ताफ्यातील ४ जणांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, लखीमपूर खिरी येथे झालेला हिंसाचार पूर्णपणे नियोजित कट असल्याचे विशेष तपास पथकाने (SIT) स्पष्ट केले आहे. या प्रकरणात मोदी सरकारमधील केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी असल्याचेही समोर आलेय..

Advertisement

मोदी सरकारमधील मंत्र्यांचा मुलगाच मोठ्या कटात सामील असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असतानाच, पत्रकारांनी या प्रकरणावरुनच त्यांना प्रश्न विचारला. मात्र, मिश्रा यांना ते आवडले नाही. पत्रकाराच्या अंगावर धावून जात मिश्रा यांनी चांगलीच शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला.

लखीमपूरमधील ओयल येथे खासगी कार्यक्रमानिमित्त केंद्रिय मंत्री अजय मिश्रा आले होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी ‘एसआयटी’च्या अहवालावर प्रश्न विचारला. मात्र, ते मिश्रा यांना आवडले नाही.

Advertisement

तुम्हाला लाज वाटली पाहिजे..!
पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मिश्रा यांचा तोल सुटला. “हा प्रश्न त्या ‘एसआयटी’ला जाऊन विचारा… डोकं फिरलंय का तुझं… तुम्ही सा… मीडियावाल्यांनी एका निर्दोष व्यक्तीला अडकवलं.. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. किती वाईट वागताय तुम्ही. तुम्हाला काय माहीत आहे..?

अशा शब्दांत अजय मिश्रा यांनी पत्रकाराला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. नंतर तर ते थेट पत्रकाराच्या अंगावरच धावून गेले. या घटनेचा व्हिडिओही माध्यमातून समोर आलाय. त्यात अजय मिश्रा हे पत्रकाराला मारण्यासाठी हात उगारताना दिसतात. या प्रकारामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

Advertisement

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, ते नव्या वादात अडकले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेतेय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement