SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमचा मोबाईल नंबर ‘9’ या अंकाने का सुरू होतो? तुम्हीही विचार करत असाल, तर मग वाचा…

जगात आजकाल डिजिटल होण्यास अनेक ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातंय. यामध्येच आपल्याला डिजिटल वळण लावणारे महत्वाचे आणि रोज उपयोगी पडणारे गॅजेट म्हणजे आपला जीव की प्राण असणारा स्मार्टफोन. यात आपण कोणाशी बोलतो, कोणाचे आणि किती कॉन्टॅक्ट नंबर्स आपल्याकडे आहे हे सगळे अंक आपल्याला जगभरात मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सहजरित्या कळत असतात. फोन नाही असा माणूस क्वचितच सापडतो.

थोड्याशा जुन्या काळात म्हणजेच आठ ते दहा वर्षांपूर्वी आपल्याला मोबाईल फोन काय असतो हे माहीती असेल, पण तो आपण घेऊ शकतो आणि घेतल्यानंतर तो साधारणतः 2G म्हणून वापरावा लागणार आहे हे ऐकून आज कदाचित गालातल्या गालात आपण अलगद हसतो. फोनद्वारे संपर्क करण्यासाठी आधी मोबाईल नंबर डायल करावा लागतो हे तर आपल्याला माहित आहेच. पण आपण आपल्या कुटुंबाला असो वा मित्र-मैत्रिणींना आपण कॉल लावताना आपल्याला कधी असा विचार आलाय का, आपल्या देशात मोबाइल नंबर 6,7,8 आणि 9 या अंकांनीच का सुरू होतात?

Advertisement

वाचा महत्वपूर्ण माहीती….

आपल्याला मोबाईल फोनने आपल्या संपर्कातील लोकांशी सहज संपर्क करणे फायद्याचे ठरते. आता आपण फक्त एका फोन कॉलद्वारे कोणाबरोबरही सहज संवाद साधू शकतो. प्रत्येक देशात मोबाइलचे नंबर वेगळे असतात. तसे आपल्या देशातही आहे. मात्र, आपल्याकडे मोबाईल नंबर 6,7,8 आणि 9 या अंकांनी सुरू होतात. याच अंकांनी नंबर सुरू होण्यामागे काही कारणेही आहेत, जाणून घ्या..

Advertisement

Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या नियमांनुसार, भारतात काही खास सरकारी सेवांच्या फोन नंबरची संख्या 1 ने सुरू होते. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांचे खास फोन नंबर किंवा अनेक हेल्पलाईन नंबरच्या सुविधाही 1 या अंकाने सुरू होतात, हेही आपण पाहिलं असेल. यामुळे मोबाईल क्रमांक 1 या अंकाने सुरू करता येत नाही. खास करून, या नंबरचा उपयोग फक्त सरकारी सेवांसाठी केला जातो.

यासोबतच लोकल, टेलिफोनचे क्रमांक 2, 3, 4 आणि 5 ने सुरू होतात. देशात सध्या जेवढे टेलिफोन वापरले जातात ते या अंकांनी सुरू करतात. त्यामुळे मोबाईल नंबर 2, 3, 4 आणि 5 ने सुरू होऊ शकत नाही.

Advertisement

तसेच, यासारखंच आपण मोबाईलविषयी पाहिलं तर वरील नंबर सोडून जे अंक शिल्लक राहतात, ते 6, 7, 8 आणि 9 हे अंक आहेत. त्यामुळे देशातील मोबाईल नंबरची सुरुवात यापैकी एका अंकाने होते. तर भारतात एसटीडी क्रमांक 0 ने सुरू होतात, हे आपल्याला माहीत असेलच! म्हणून यामुळेच देशात विविध नंबरवरील वेगवेगळ्या सेवा या विशेष आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement