SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर..! वन-डे मालिकेतून विराट कोहलीची माघार..?

कॅप्टन पदावरुन विराट कोहली याची हकालपट्टी केल्यापासून टीम इंडियातील वाद उफाळून आला आहे.. टीम इंडियात उघड उघड दुफळी निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या निर्णयानंतर विराट कोहली मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसत आहे..

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा लवकरच सुरु होत आहे. भारतासाठी हा दौरा आव्हानत्मक असणार आहे. मात्र, दुसरीकडे विराट कोहली याला कॅप्टन पदावरुन दूर केल्यापासून टीम इंडियात काहीही आलबेल नसल्याचेच दिसत आहे. या साऱ्या वादाचा संघाच्या खेळावरही परिणाम होण्याची शक्यता आहे..

Advertisement

सराव करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून टेस्ट टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा याने माघार घेतली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतून विराट कोहलीनेही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे…

कुटुंबाला वेळ देणार..
याबाबत विराट कोहली याने ‘बीसीसीआय’ला पूर्वकल्पना दिल्याचे समजते. मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाला वेळ देण्यासाठी विराट कोहलीने सुटी घेतल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहे. हा विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना असेल. त्यानंतर सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेऊन विराट कुटुंबाला वेळ देणार असल्याची दाट शक्यता आहे.

प्रियांक पांचालची निवड
विराटला कर्णधार पदावरून हटवल्यापासून रोहितच्या हाती सर्व जबाबदारी दिल्यानंतर अशा चर्चा समोर येणे, ही संघासाठी चांगली बातमी नाही. रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यामुळे त्याच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाल याची निवड झाली आहे.

Advertisement

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, तत्पूर्वीच संघातील वाद समोर आल्याने टीम इंडियापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement