SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हिवाळ्यात वाढणाऱ्या वजनाचे टेन्शन आलंय.. मग हा ज्यूस पिऊन तरी पाहा..!

हिवाळ्यात हवामान छान असते… भूक चांगली लागते. मग काय.. मागचा पुढचा विचार न करता, आपणही समोर येईल त्यावर आडवा हात मारतो.. त्यात रात्र मोठी नि दिवस छोटा.. त्यामुळे साहजिकच झोपही चांगली होती.. आरामही जास्त वेळ होतो..

कडाक्याच्या थंडीत तर उबदार कपडे सोडावासे वाटत नाहीत. मग, व्यायामाला बुट्टी मारली जाते.. शारीरिक हालचाली कमी होतात नि वजनाचा काटा हळुहळू वर चढताना दिसतो. तसतसे टेन्शनही वाढते..

Advertisement

हिवाळ्यातही वजन नियंत्रणात ठेवता येते.. शिवाय आजार दूर ठेवण्यासाठी ‘इम्युनिटी’ही वाढविता येते.. त्यासाठी फक्त एकच करायचे, ज्युस प्यायचा.. पण कोणता, तो कसा करायचा..? चला तर मग जाणून घेऊ या त्याची साधी, सोपी रेसीपी…

साहित्य
हळद पावडर 1 ग्रॅम
काळी मिरची
तुळशीची पाने
लिंबाचा रस
लसूण

Advertisement

कृती
लसूण सोलून त्याचे बारीक तुकडे करा. ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात हा लसूण टाका. त्यात हळद पावडर, काळी मिरची, लिंबाचा रस नि तुळशीची पाने टाका… हे सगळे व्यवस्थित मिक्स करा. झाला आपला ज्यूस तयार…!

कधी नि किती प्यायचा..?
हा ज्युस तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी पिता येईल. मात्र, दिवसातून एकदाच प्या बरं… एक ग्लास पेक्षा जास्त हा ज्यूस प्यायल्यास पोट बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे..

Advertisement

ज्यूस पिण्याचे फायदे
– हा ज्युस  प्यायल्याने शरीरातील फॅट्स जळतात. ज्युसमधील काळ्या मिरीमुळे शरीरातील मेटा बॉजिल्ट चांगल्या पद्धतीने काम करते.
सकाळी अनोशा पोटी ज्युस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.. तसेच बॉडी स्ट्रेसही कमी होतो.

हेही ट्राय करा..!
वातावरण बदलामुळे हिवाळ्यात आजार वाढतात.. त्यामुळे इम्युनिटी वाढविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हळद नि आल्यापासून बनवलेले पेय प्यायला हवं..

Advertisement

साहित्य
एक पाव कुटलेले आलं
एक पाव चमचा हळद
1 चमचा अॅपल सायडर विनेगर
मध

कृती
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुटलेले आलं नि हळद टाकून हे मिश्रण 5 ते 10 मिनिटे उकळून घ्या. नंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गाळून घ्या. हलकंसं थंड झाल्यानंतर त्यात मध आणि अॅपल सायडर विनेगर मिक्स करा. रोज सकाळी प्या.. नि वजनाला करा बाय बाय..!

Advertisement

टीप – वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकापर्यंत पोहोचवत आहोत. याबाबत ‘स्पेडइट’ कोणताही दावा करीत नाही. त्यामुळे कोणताही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा…!

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement