SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💥 पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 पोलीस शहीद तर 12 पोलीस गंभीर जखमी

👮🏻 देशातील श्रीनगरजवळील उच्च सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागात दहशतवाद्यांनी सोमवारी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या बेछूट गोळीबारात 2 पोलीस शहीद झाले, तर 12 गंभीररीत्या जखमी झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे.

🔫 दहशतवाद्यांनी केला अंधाधुंद गोळीबार:

Advertisement

▪️ जम्मू-काश्मीर पोलीस सशस्त्र दलाच्या पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्य करून बसवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 2 पोलीस शहीद झाले. त्यापैकी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक शिपाई असल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट करून दिली.

▪️ दहशतवाद्यांच्या गोळीबारात 14 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करून परिसराची नाकाबंदी करण्यात आल्याचे ट्वीट सर्वप्रथम जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले होते. परंतु नंतर जखमी पोलिसांपैकी 2 पोलीस शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

▪️ प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला दोन दहशतवाद्यांनी केला, ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला त्यावरून ते ‘आत्मघाती’ दहशतवादी गटाचे असल्याचे सांगण्यात येतेय. दोनच दिवसांपूर्वी बांदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस शहीद झाले होते. तो हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

📍 श्रीनगरचे उपनगर असलेल्या झेवान भागात पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात आहेत, यासोबतच पोलिसांच्या सशस्त्र दलाचा तळ आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) छावण्याही याच भागात आहेत. तरीही दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांत 19 पोलीस शहीद झाले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement