जगात सर्वत्र कोरोना महामारीमुळे प्रचंड त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. त्यावरही अनेक देशांनी शाळेतील शिक्षण ऑनलाईन केलं आहे. ऑनलाईन शिक्षण (Online education) असो वा ऑनलाईन नोकरी (Online Jobs) आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन होतात.
सध्या कोणी कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी आता ऑनलाईन कोर्सेसला (Best online courses) जास्त महत्त्व देतात. ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी ऑनलाईन स्किल्स कोर्सेस (Skill courses online) करून साक्षर आणि स्किल्ड व्हावं, यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्त्न केले जात आहेत. आता विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) आवश्यक नियमावली अधिसूचित केली आहे, ज्यात संपूर्ण ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करण्याची सुविधा विद्यापीठांना मिळणार आहे. एवढंच नव्हे, तर विद्यार्थ्यांना Online courses ही करता येणार आहेत.
UGC ने SWAYAM (Study Webs of Active Learning for Young Aspiring Minds) रेग्युलेशन्स, 2021 (SWAYAM Regulations 2021) मार्फत ऑनलाईन लर्निंग कोर्सेससाठी क्रेडिट फ्रेमवर्क तयार केल्याचं समजतंय. त्यानुसार एका सेमिस्टरमध्ये एका विशिष्ट प्रोग्राममध्ये ऑफर केल्या जाणार्या एकूण अभ्यासक्रमांपैकी 40% अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण करता येणार असल्याची माहीती आहे.
यूजीसी (UGC) नं जारी केली कोर्सेसची यादी:
▪️ जानेवारी, 2022 सेमिस्टरसाठी ऑफर केल्या जाणार्या अभ्यासक्रमांची (courses list for SWAYAM 2022) यादी विद्यार्थ्यांना https://swayam.gov.in/ वर उपलब्ध आहे. येथे All Courses वर क्लिक केल्यावर आपल्याला कोर्सेस पाहता येणार आहे.
SWAYAM द्वारे हे ऑनलाईन कोर्सेस (SWAYAM Online courses) घेतले जाणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन कोर्सेस करण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा पार्ट टाईम कोर्सेस शिकण्यासाठी धडपडणाऱ्या (Part Time Online Learning) उमेदवारांना ही संधी आहे. या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे पुन्हा वातावरण त्रासदायक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्किल्स वाढवण्यासाठी या कोर्सेसवर भर दिल्याने ते पूर्ण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन कामेही तुम्हाला तुमच्या मर्जीने मिळवता येतील. यामुळे पैशाची चिंता भासणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065