SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! नेटफ्लिक्सचे प्लॅन्स झाले स्वस्त, नवे दर जाणून घ्या..

सध्याच्या काळात बहुतांश लोकांना OTT वर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहण्याची आवड आहे. नेटफ्लिक्स हे सर्वात लोकप्रिय ओटीटी आहे. मात्र त्याचं मासिक भाडं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. आता ओटीटी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या मासिक शुल्कात वाढ केली असता नेटफ्लिक्सने आपल्या मासिक शुल्कात कपात केली आहे.

2016 पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत असून पहिल्यांदाच आपल्या दरात कमी केली आहे. भारतातील ओटीटीमधील तीव्र स्पर्धा पाहता हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सवर सर्व प्रकरच्या कथानकांचा समावेश असतो. त्यामुळे दर कमी झाल्याने नेटफ्लिक्स प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

Advertisement

▪️ एंट्री-लेव्हल बेसिक प्लॅनमध्ये ग्राहकांना वेब सीरिज आणि चित्रपट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) मध्ये एकाच वेळी एकाच मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहता येतात. हा प्लान 499 प्रति महिना होता. तो आता 199 रुपये करण्यात आला आहे.

▪️ नेटफ्लिक्सचा 2 शेअरिंग स्क्रिन असलेला हाय डेफिनेशन प्लान 649 रुपयांवरून 499 रुपये करण्यात आला आहे.

Advertisement

▪️ नेटफ्लिक्सचा अल्ट्रा हाय डेफिनेशन 4 स्क्रिन शेअरिंग प्लान 799 रुपयांवरून 649 रुपये करण्यात आला आहे.

▪️ नेटफ्लिक्सची मोबाईल प्लॅन भारतात जुलै 2019 पासून 199 रुपये प्रति महिना होता. आता हा प्लॅन 149 रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. नवीन किंमत युजर्सच्या पुढील बिलिंग सायकलपासून लागू होईल.

Advertisement

ग्राहकांना याचा फायदा त्यांच्या सोयीनुसार निवडता येणार आहे. या 14 डिसेंबरपासून यांसाठी अपग्रेडशन फिचर आणलं गेलं आहे. त्यात स्क्रिनवर एक पॉपअप येईल त्यात नविन योजनेविषयी अपग्रेड करण्याचं विचारलं जाईल, असं नेटफ्लिक्स इंडियाच्या मोनिका शेरगिल यांनी सांगितलं.

बहुतांश भारतीय युजर्स नेटफ्लिक्स वापरत नाहीत. नेटफ्लिक्सच्या दरांमुळे अनेक जण त्याकडे पाठ फिरवत होते. नेटफ्लिक्स डिस्ने+ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी एंटरटेनमेंटचे ZEE5 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचे SonyLIV यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते. अलीकडेच व्हिडीओ स्ट्रिमिंग पॉप्युलर कंपनी नेटफ्लिक्सने एक वेबसाइट लाँच केलीय. या वेबसाइटचं नाव ‘Tudum’ असं असून या वेबसाईटवर एकाच ठिकाणी युजर्सला बातम्या, इंटरव्ह्यू, Behind the Scene Video आणि अनेक बोनस फीचर्स मिळणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement