SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार..?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme-OPS) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येते..

गेल्या काही दिवसांपासून केंद्रिय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत होती. त्यावर मोदी सरकारने कायदा मंत्रालयाकडून मत मागविले आहे. कायदा मंत्रालयाच्या उत्तरानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे..

Advertisement

संसदेत प्रश्न उपस्थित..
पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना ‘एनपीएस’मधून वगळण्यासाठी आणि जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यासाठी वित्तीय सेवा विभाग (DFS) आणि कायदा मंत्रालयाचे मत मागवलेय का, असा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला होता..

त्यावर कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले..

Advertisement

कायदा मंत्रालयाकडे प्रस्ताव
ते म्हणाले, की “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्र सरकारने हे प्रकरण कायदा मंत्रालयाकडे पाठवले आहे.. मात्र, कायदा मंत्रालयाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.”

“वित्तीय सेवा विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना ‘एनपीएस’ (NPS)च्या कक्षेतून वगळून त्यांना ‘ओपीएस’ अंतर्गत समाविष्ट करू शकतात. ज्यांच्या भरतीसाठी 01 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिरात दिली होती, त्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल..”

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement