SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वन-डे मालिकेतून विराटने माघार घेतलीय का..? खुद्द ‘बीसीसीआय’ने केला मोठा खुलासा..!

भारतीय क्रिकेट सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आले आहे. टी-20 व वन-डे फाॅरमॅटमध्ये राेहित शर्माची निवड करण्यात आल्यापासून टीम इंडियात सारे काही आलबेल नसल्याचे दिसते. वन-डे कर्णधार पदावरुन हकालपट्टी केल्यापासून विराट कोहली हा ‘बीसीसीआय’वर नाराज असल्याचेही बोलले जाते..

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा होत आहे. सुरुवातीला टेस्ट व नंतर वन-डे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, दुखापतीमुळे नव्यानेच टेस्ट टीमचा उपकर्णधार केलेल्या रोहितने या मालिकेतून माघार घेतली आहे..

Advertisement

कर्णधार पद गेल्याने नाराज असलेल्या विराट हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डे मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. वैयक्तिक कारणास्तव तो वन-डे मालिका खेळणार नसल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात होते.

रोहित दुखापतीमुळे कसोटी संघात नाही, तर वैयक्तिक कारणामुळे विराट हा वन-डे मालिका खेळणार नाही. त्यावरून या दोघांना एकमेकांसोबत खेळायचेच नसल्याचे बोलले जात होते.

Advertisement

‘बीसीसीआय’ने काय म्हटलंय..?
दरम्यान, खुद्द ‘बीसीसीआय’नेच या प्रकरणावर भाष्य केले आहे.. विराट वन-डे मालिकेत खेळणार नसल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. वन-डे मालिकेतून विश्रांतीसाठी विराटने कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नसल्याची माहिती ‘बीसीसीआय’ (BCCI)च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले..

“विराटने वन-डे मालिकेतून विश्रांती घेण्यासंदर्भात ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शहा यांच्याकडे कोणतीही अधिकृत विचारणा केलेली नाही. पुढे काय होईल, ते आताच सांगता येणार नाही, पण सध्या तरी तो वन-डे खेळणार नसल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

लेकीचा वाढदिवस नि 100 वी टेस्ट
आपल्या लाडक्या लेकीच्या वामिकाच्या पहिल्या वाढदिवसामुळे विराट वन-डेतून माघार घेणार असल्याचे वृत्त होते, पण वामिकाचा पहिला वाढदिवस हा 11 जानेवारीला आहे. या दिवशी तिसरी कसोटी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या पहिल्या बर्थ-डेच्या दिवशीच विराट शंभरावी कसोटी खेळणार आहे.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement