SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ योजनेंतर्गत गाय-म्हशीसाठी मिळतात 40 ते 60 हजार रुपये, योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या..

देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना (pashu kisan credit card scheme) सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांस एक ठराविक रक्कम कर्ज म्हणून दिली जाते आणि ती बँकेच्या ठरलेल्या व्याजदरानुसार आणि मुदतीनुसार परत करावी लागते.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत लाभ कसा मिळणार?

Advertisement

▪️ गाय: पशुपालक शेतकऱ्यास 40,783 रुपये प्रति गाय मिळेल.
▪️ म्हैस: 60,249 रुपये प्रति म्हैस मिळेल. हे प्रति म्हशी असेल.
▪️पशुपालक शेतकऱ्याने शेळीचे पालन केले असेल, तर त्याला प्रति शेळी रु. 4,000 देण्यात येतील.
▪️ किसान पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी केंद्र शासनाकडून रु. 1,60,000 पर्यंतचा निधी मिळवू शकतात.

आवश्यक पात्रता: देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही आणि जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात, अश्या सर्व शेतकरी आणि पशुपालकांना लाभ घेता येणार आहे.

Advertisement

पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज कुठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. बँकेमार्फत पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे. शेतकरी नोंदणीची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र ही कागदपत्रे देणे गरजेचे आहेत.

Advertisement

(सदर लेखात बँकेचे कर्ज, व्याज, मुदत किती असेल, या गोष्टी बँकेत जाऊन व्यवस्थित समजून खात्री करून घ्यावी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement