SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘म्हाडा’च्या परीक्षेबाबत मोठी घोषणा..! आता ही खासगी कंपनी घेणार परीक्षा, आव्हाड यांची माहिती..

आरोग्य विभागानंतर ‘म्हाडा’च्या (MHADA Exams) परीक्षेची पेपर फुटल्याने राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली.. ऐन परीक्षेच्या दिवशीच ही परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता..

‘म्हाडा’मध्ये तब्बल ५६५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.. त्यासाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा होणार होती. मात्र, तत्पूर्वीच या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले.. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आल्याचेही सांगण्यात येते..

Advertisement

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी मध्यरात्रीच (रविवारी) ही परीक्षा रद्द करीत असल्याचे जाहीर केले.. आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आली होती. त्यामुळे अशा परीक्षा घेण्यासाठी कोणीच पात्र नाही का? असा प्रश्न उपस्थित होत होता…

Advertisement

दरम्यान, म्हाडाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आलीय.. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या (MHADA) परीक्षेबाबत मोठी घोषणा केलीय. एका खासगी कंपनीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्याचे आव्हाड यांनी सांगितलेय..

आता कोण घेणार परीक्षा..?
मंत्री आव्हाड म्हणाले, की आता ‘म्हाडा’ची परीक्षा ‘टीसीएस’ अर्थात ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ (TATA Consultancy Services) या खासगी कंपनीतर्फे घेतली जाणार आहे.. आता या परीक्षेत कुठलाही घोटाळा होणार नाही, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केलाय.

Advertisement

ते म्हणाले, की “म्हाडाची परीक्षा घेण्याचे संपूर्ण अधिकार ‘टीसीएस’ला दिले आहेत. त्यामागे पारदर्शकता हा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता परीक्षा रद्द केली होती. आता सगळे अधिकार ‘टीसीएस’ला दिल्याने पारदर्शकपणे या परीक्षा पार पडतील.”

“भावी पिढी घडविण्यासाठी अशा महत्त्वाच्या परीक्षा ‘टीसीएस’ किंवा ‘आयबीपीएस’ (IBPS) संस्थांमार्फतच घेतल्या गेल्या पाहिजेत. प्रामाणिकपणे मेहनत करून, दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. आम्ही या मुलांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही,” असं आव्हाड म्हणाले.

Advertisement

दरम्यान, विद्यार्थ्यांनी ज्या दलालांना पैसे दिलेत, त्यांची नावे समोर आणावीत. या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील, त्यांना आम्ही धडा शिकविणार असल्याचा इशारा आव्हाड यांनी दिलाय..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement