पंजाबमधील चंदीगढच्या हरनाज संधू हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला. हा ताज मिळविणारी ती केवळ तिसरीच भारतीय महिला ठरलीय.. यापूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेन (1994) व लारा दत्ता (2000) यांनाच हे यश मिळवता आले आहे.. भारताने तब्बल 21 वर्षांनंतर ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब पटकावलाय.
इस्रायलमधील इलात येथे काल (रविवारी) 70 वी ‘मिस युनिव्हर्स’ (Miss Universe 2021) स्पर्धा पार पडली. त्यात 80 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यातूनही ‘टाॅप-3’मध्ये स्थान मिळविण्यात हरनाज यशस्वी ठरली होती. नंतर पॅराग्वे नि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत हरनाजने हा मुकूट जिंकला..
सौंदर्यवतींच्या या स्पर्धेत फक्त सौंदर्य असून चालत नाही, तर ‘ब्युटी वुईथ ब्रेन’ही तितकेच महत्वाचे असते. परीक्षकांच्या प्रश्नांना तुम्ही कसे सामोरे जाता, यावर जय-पराजय ठरतो..
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
टॉप-3 मधील स्पर्धकांना परीक्षकांनी एक विशेष प्रश्न विचारला होता. त्यावरच स्पर्धेचा निकाल ठरणार होता. ‘दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल..?’ असा तो प्रश्न होता.
हरनाजने काय उत्तर दिले..?
हरनाज म्हणाली, की “आजच्या तरुणाईवर सर्वात मोठं दडपण कोणते असेल, तर ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा. जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता, म्हणूनच मी आज इथे उभी आहे…!”
हरनाजच्या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.. परीक्षकांनाही तिचे हे उत्तर भावले नि अखेर हरनाजच्या डोक्यावर ‘मिस युनिव्हर्स’चा ताज चढला..
कोण आहे हरनाज..?
2017 मध्ये हरनाजने ‘टाइम्स फ्रेश फेस बॅक’सह तिच्या सौंदर्य स्पर्धेचा प्रवास सुरू केला होता. 2017 मध्ये तिने ‘मिस चंदिगढ’चा खिताब जिंकला. नंतर तिने ‘फेमिना मिस इंडिया, पंजाब 2019’ ही स्पर्धाही जिंकलीय. ‘मिस इंडिया-2019’मध्ये ती ‘टॉप-12’ पर्यंत पोहोचली होती.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065