SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! विमा कंपन्यांकडून खरीपातील नुकसान भरपाई खात्यात जमा..

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 45 लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. हातातोंडाशी आलेले पिक तर गेले, किमान काहीतरी नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती.

शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची प्रीमियम रक्कम भरली, केंद्र व राज्य सरकारने मिळून अब्जावधी रुपयांचा विमा हप्ता दिल्यानंतरही विमा कंपन्यांकडून भरपाईकडे दुर्लक्ष होत होते. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अनेकदा आंदोलने करावी लागली..

Advertisement

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही ‘वेळेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना विमा कंपन्यांना केली होती. सर्वच स्थरातून विमा कंपन्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. परभणी, बुलडाण्यातील विमा प्रतिनीधींवर गुन्हे दाखल झाले होते.

विमा रक्कम खात्यावर वर्ग..
अखेर राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात या विमा कंपन्यांना 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर जाग आलेल्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे..

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.. आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांना 1770 कोटींहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे.

खरेतर दिवाळीतच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होणे अपेक्षित होते, पण विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे मिळण्यास हा विलंब झाला. पिकांचे नुकसान झाल्यानंतर तब्बल 3 महिन्यांचा, तर नुकसानीचे दावे करुन अडीच महिने झाल्यावर आता भरपाई जमा होण्यास सुरवात झालीय.

Advertisement

उर्वरित पैसै लवकरच मिळणार..
जिल्हा प्रशासनाने 19 लाख 66 हजार शेतकऱ्यांचे दावे निकाली काढले. या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. विमा कंपन्यांनी 1351 कोटी रुपये दिले असून, अजून 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 968 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यासाठी पुढील 4-5 दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असली, तरी भरपाईबाबत काही शंका असल्यास शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, कृषी अधिकारी किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशीं संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement