महाराष्ट्रात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच मोठा दिलासा दिलासाही मिळाला आहे. आतापर्यंत राज्यात 18 जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असून, त्यापैकी 9 जण संसर्गमुक्त होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे. नागपूरमध्ये काल (ता. 12) रविवारी पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या या सर्व 18 रुग्णांपैकी 9 रुग्णांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यात आल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि मग डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
कुठे किती ओमिक्रॉन बाधित…?
देशात एकीकडे निर्बंध शिथिल होताना दुसरीकडे खळबळ उडवून देणाऱ्या ओमिक्रॉनचे हळूहळू मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 1, कल्याण-डोंबिवलीत 1 आणि नागपूरमध्ये 1 असे एकूण 18 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 9 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच देशातील ओमिक्रॉनबाधित आता एकूण 38 झाले आहेत.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेतून नागपूरमध्ये आलेल्या 40 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाली असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सध्या त्या रुग्णाला एम्स हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात 30 जण आले त्या सर्वांचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे असल्याची माहीती आहे. रूग्ण यापूर्वी 11 एप्रिल रोजी कोविडबाधित आढळला होता. तेव्हा देखील त्याच्यात सौम्य लक्षणे होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नव्हती.
राज्यात सध्याची कोरोना स्थिती…
▪️ राज्यात काल दिवसअखेर 699 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण 64,92,504 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
▪️ राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के एवढे, राज्यात कालअखेर 704 नवीन रुग्णांचे निदान
▪️ राज्यात काल 16 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका
▪️ सध्या राज्यात 75,313 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018