SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक..! ‘बिटकाॅईन’बाबत हॅकर्सने दिला धक्कादायक संदेश..!

‘क्रिप्टोकरन्सी’बाबत देशात गोंधळाची स्थिती आहे. मोदी सरकारने या आभासी चलनास मान्यता देण्यास नकार दिलेला आहे.. असे असताना, आज (रविवारी) पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरुन ‘बिटकॉइन’ला (Bitcoin) मान्यता देत असल्याचे ट्विट करण्यात आले..

एकीकडे ‘क्रिप्टोकरन्सी’ला मान्यता देण्यास मोदी सरकार तयार नसताना, अचानक मध्यरात्री पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी ‘बिटकाॅईन’ला मान्यता दिल्याचे ‘ट्विट’ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. मात्र, त्यानंतर जे समोर आले, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला..

Advertisement

Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.. नेमका हा काय प्रकार होता नि त्यामुळे कसा गोंधळ उडाला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

नेमकं काय घडलं..?
जगभरात मोठ्या प्रमाणात ‘क्रिप्टोकरन्सी’द्वारे (cryptocurrency) व्यवहार होत असले, तरी भारतात अजून त्यास कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवशेनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. मात्र, मोदी सरकारने या चलनास कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता..

Advertisement

असे असताना, पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरून आज (ता. 12) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली. त्यात ‘बिटकॉइन’ला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले होते. थेट पंतप्रधान मोदी यांच्याच ट्विटर अकाऊंटवरुन मध्यरात्री घोषणा केल्याने खळबळ उडाली.

दोन वेळा केले एकच ट्विट
दरम्यान, काही वेळातच मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले. अकाउंट हॅक केल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.. त्यानंतर काही वेळातच पहिले ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र, नंतर पुन्हा एकदा तेच ट्विट पुन्हा करण्यात आले व नंतर तेही हटविण्यात आले.

Advertisement

पंतप्रधान कार्यालयाचे आवाहन
पंतप्रधान कार्यालयाने या हॅकिंगबाबत अधिकृत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली असून, याबाबतची माहिती ट्विटरला दिली आहे. आता त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकरने केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement