SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हाॅटस अ‍ॅप’वर जवळच्या नातेवाईकाने पैसे मागितलेत का..? सावध व्हा, नाहीतर बॅंक खाते रिकामे होईल..

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता भामटेही हायटेक झाले आहेत. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन नागरिकांना गंडा घालण्यात येत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या जमान्यात युजर्सनाही ‘स्मार्ट’ व्हावे लागणार आहे..

सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होतो. त्यातही ‘व्हाॅटस-अ‍ॅप’ वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. मात्र, आता फसवणुकीसाठी हॅकर्सनी या ‘अ‍ॅप’चा सहारा घेतला आहे. त्यामुळे व्हाॅटस् अ‍ॅपचा (Whats app) वापर करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे..

Advertisement

सायबर चोरांनी व्हाॅटस् अ‍ॅप वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.. आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाॅटस् अ‍ॅप नेहमीच अपडेट देत असते, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे.

कसे लूटले जाते..?
‘व्हाॅटस अ‍ॅप’वर अनेकदा ‘हॅलो माॅम-डॅड’ (Hello Mom, Dad) असे मेसेज पाठविण्यात येतात. ही स्कॅमची सुरुवात असते. त्यानंतर तुमची मुले अडचणीत असून, त्यांना पैशांची मोठी गरज असल्याचे सांगतात. त्यानंतर ठराविक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले जाते.

Advertisement

पोटच्या मुलाच्या प्रेमाखातर अनेकदा कोणतीही खातरजमा न करता, पालकही अशा खात्यांवर मोठी रक्कम ट्रान्सफर करतात नि फसले जातात. विशेषत: अमेरिकेत मोठ्या प्रमाणात असे प्रकार समोर आले होते. त्यानंतर आता भारतातही या घटना घडल्या आहेत..

एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचे व्हाॅटस अप अकाऊंट हॅक करुन तुम्हाला ‘पॉपअप मेसेज’ पाठविला जाताे. जवळच्या व्यक्तीकडून (भाऊ, बहीण, खास मित्र, कुटुंबीय) पैसे पाठविण्याबाबत मेसेज आल्याचे दिसते. त्यामुळे मेसेज खरा असल्याचं समजून पैसे ट्रान्सफर केले जातात.

Advertisement

जवळच्या व्यक्तीनेच पैशांची मागणी केल्याचे समजून पैसे पाठविले जातात. मात्र, त्यानंतर काही मिनिटांत तुमचे बँक अकाउंट हॅक करुन सगळे पैसे काढून घेतले जातात. त्यामुळे अगदी जवळच्या व्यक्तीनेही पैशांची मागणी केल्यास, थेट पैसे पाठविण्यापूर्वी थेट संपर्क साधून माहिती करुन घ्यायला हवी..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement