SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बॅंक बुडाल्यास ठेवीदारांच्या पैशांचे काय..? खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सांगितले सोल्युशन..!

मागील काही काळात गैरव्यवहार नि आर्थिक अनागोंदीमुळे देशातील अनेक बँका दिवाळखोरीत गेल्या… बुडीत निघाल्या. बँका बुडाल्यास ठेवीदारांच्या पैशांचे काय, त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणार का? ते कसे नि किती मिळणार, असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.. ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या विषयावर ते बोलत होते.

Advertisement

पंतप्रधान मोदी म्हणाले, की “बँक (Bank) बुडाल्यास यापूर्वी ठेवीदारांना त्यांचे स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागत. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. त्यासाठी सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने सुधारणा केल्या आहेत.”

“आपल्या देशात बँक ठेवीदारांसाठी विमा प्रणाली 60 च्या दशकात तयार केली होती. त्यानुसार, बँकेतील केवळ 50, 000 रुपयांपर्यंतच हमी दिली जात होती. नंतर ती वाढवून 1 लाख केली. आता ही रक्कम 5 लाख रुपये करण्यात आली आहे.”

Advertisement

3 महिन्यांत पैसे परत मिळणार
ते म्हणाले, की “बँकेत अडकलेले पैसे ठेवीदारांना परत करण्यासाठी पूर्वी कोणतीही मुदत नव्हती. मात्र, आता 90 दिवसांत, म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी बंधनकारक केलाय. त्यामुळे बँक बुडीत निघाली, तरी ठेवीदारांना 90 दिवसांत त्यांचे पैसे परत मिळतील..”

कोणतीही बँक अडचणीत आली, तरी ठेवीदारांना त्यांचे 5 लाख रुपयांपर्यंत पैसे नक्कीच मिळतील. त्यात सुमारे 98 टक्के खात्यांचा समावेश आहे. त्यामुळे ठेवीदारांचे 76 लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत. असे सर्वसमावेशक सुरक्षा कवच विकसित देशांमध्येही नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Advertisement

1 लाख ठेवीदारांचे पैसै परत
“कोणताही देश वेळच्या वेळी समस्या सोडवू शकतो. त्या बिघडण्यापासून वाचवू शकतो, पण आपल्याकडे वर्षानुवर्षे असणाऱ्या समस्या पुढे ढकलण्याची प्रवृत्ती आहे. मात्र, आजचा नवा भारत समस्या टाळत नाही, तर समस्या सोडवण्यावर भर देतो..” असे ते म्हणाले..

गेल्या काही दिवसांत 1 लाखाहून अधिक ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ही रक्कम सुमारे 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज या कार्यक्रमात आणि त्यानंतरही आणखी 3 लाख ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement