SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ही आहेत जगातील सर्वात टाॅप-10 महागडी शहरे..! येथे एक दिवस राहणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर..

जगातील प्रत्येक देश सध्या वाढत्या महागाईला तोंड देत आहे. कोरोना महामारीनंतर तर जगभरात महागाई गगणाला भिडली. कोरोनामुळे एकीकडे नोकऱ्या-व्यवसायांवर गडांतर आले, तर दुसरीकडे महागाई वाढली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे.

जगात काही शहरे तर अशी आहेत, की तेथे तुम्ही स्वप्नातही राहण्याचा विचार करणार नाही, इतकी महाग आहेत. जगातील अशा सर्वाधिक महाग ‘टॉप-10’ शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आलीय. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

जगातील महाग शहरे
जगातील विविध शहरांत राहण्यासाठी किती खर्च येतो, याबाबत ‘द इकोनाॅमिस्ट’ (The Economist) या प्रसिद्ध मासिकाने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी घोषित करण्यात आलीय. 2021 च्या सर्वेक्षणात 173 शहरांचा अभ्यास करण्यात आलाय.

1. फ्रान्सची राजधानी पॅरिस गतवर्षी महाग शहरांच्या यादीत नंबर वन होते. मात्र, यंदा पॅरिसला मागे टाकून इस्राईलमधील ‘तेल अवीव’ शहराने पहिले स्थान पटकावलंय.

Advertisement

2. पॅरिस आता या यादीत दुसऱ्या स्थानी आले आहे. फ्रान्सची राजधानी पूर्वीपासून जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. मात्र, त्यानंतरही येथील पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.

3. जगभरातील पर्यटकांचे आवडते सिंगापूरने या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. हे शहर आग्नेय आशियाचे आर्थिक केंद्र मानलं जातं. येथील कायदे अतिशय कडक आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जगातील अव्वल शहरांतही सिंगापूरचा समावेश होतो.

Advertisement

4. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमधील झुरिच हे शहर चौथ्या स्थानी आहे. या शहरात फारच कमी अपार्टमेंट्स आहेत.

5. महागड्या शहरांमध्ये हाँगकाँग पाचव्या स्थानी आहे. पूर्व नि पाश्चात्य संस्कृतीचे मिश्रण येथे दिसते. दाट लोकवस्तीच्या या शहरात उंच इमारतींनंतरही भाडे खूप जास्त आहे.

Advertisement

6. जगातील महाग शहरांत अमेरिकेतील न्यूयॉर्क सहाव्या क्रमांकावर आहे. हे एक प्रमुख व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन केंद्र आहे, ज्याचा जगभरात प्रभाव पडतो.

7. स्वित्झर्लंडमधीलच जिनिव्हा शहरात अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये आहेत. महाग शहरांच्या यादीत हे शहर सातव्या क्रमांकावर आहे.

Advertisement

8. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. परंतु हे शहरही खूप महाग आहे. युरोपियन युनियनच्या इतर देशांच्या तुलनेत येथे 40 टक्के अधिक महाग वस्तू मिळतात.

9. महागड्या शहरांच्या यादीत लॉस एंजेलिस नवव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील दुसरे महाग शहर आहे. हॉलीवूडमधील स्टार अभिनेते या शहरात राहतात.

Advertisement

10. महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या 10 शहरांत दहाव्या क्रमांकावर जपानमधील ‘ओसाका’ शहर आहे. जपानची राजधानी टोकियो नंतर हे दुसरे मोठे आर्थिक केंद्र मानले जाते..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement