SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 टीम इंडियाला दीड महिना बायो-बबलमध्ये राहावं लागणार? ‘असा’ होणार दक्षिण आफ्रिका दौरा..

😷 भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका असताना भारतीय संघाला आता पुढील दीड महिना कडक निर्बंध असलेल्या बायो-बबलमध्ये वेळ घालवावा लागणार आहे

🏨 प्राप्त माहीतीनुसार, टीम इंडिया प्रिटोरियाच्या एका रिसॉर्टमध्ये थांबणार आहे. या लॉजमध्ये भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच बायो बबल लॉकडाऊन करण्यात आले आहे.

Advertisement

💁🏻‍♂️ दक्षिण आफ्रिकेतील मीडियाच्या माहीतीनुसार, भारतीय क्रिकेट टीम आलिशान आयरिन कंट्री लॉजमध्ये थांबणार आहे. भारतीय संघ 17 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये पोहोचणार आहे. याच रिसॉर्टमध्ये आधी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ थांबले होते. हा रिसॉर्ट आतापासूनच पूर्णपणे सिल करण्यात आला आहे.

▪️ क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने हॉटेलच्या व्यवस्थापनाला स्पष्ट आदेश दिलेले आहे.
▪️ ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे, तिथे कुठलीही बाहेरची व्यक्ती प्रवेश करू शकत नाही.
▪️ हॉटेल स्टाफलाही क्वारंटाईन राहावे लागेल.
▪️ हॉटेल स्टाफचीही कोरोना चाचणी होणार आहे.
▪️ हॉटेलमध्ये कोविड-19 शी संबंधित डॉक्टर, अधिकारी तैनात असणार आहेत.

Advertisement

📍 भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. 26 डिसेंबरला सुरू होणारी ही मालिका भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र यापेक्षा मोठे आव्हान भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून वाचवण्याचे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement