परदेशातून महाराष्ट्रामध्ये आयात करण्यात येत असलेल्या विदेशी मद्यावरील आयात शुल्क तब्बल 150 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे विदेशी मद्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने मागील महिन्याच्या 18 नोव्हेंबरपासून विदेशी मद्यावरील आयात शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार, उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर जाहीर केले आहेत.
लोकांना सरकारच्या या निर्णयामुळे विदेशी मद्याची अन्य राज्यांतून ने-आण करण्याची आवश्यकता पडणार नाही. जर कोणी ने-आण केलीच, तर तशी कारवाईही होणार असल्याची माहीती आहे. सध्या तरी आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले आहे. लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. माहिती देतांना उत्पादन शुल्क अधिका-याने सांगितले की, या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे.
कोणते मद्य झाले स्वस्त?
▪️ शिवास रिगल (जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की: जुना दर 5850 // नवीन दर 3850 रुपये
▪️ जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की: जुना दर – 5760 // नवीन दर – 3750 रुपये
▪️ जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की: जुना दर – 3060 // नवीन दर – 1950 रुपये
▪️ जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की: जुना दर – 3800 // नवीन दर 2500 रुपये
▪️ ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की: जुना दर – 3075 // नवीन दर – 2100 रुपये
▪️ जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की: जुना दर – 3060 // नवीन दर 2100 रुपये
▪️ जॉर्डन्स लंडन ड्राय जीन: जुना दर 2400 // नवीन दर 1650 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018