कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास होत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ठिकठिकाणच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, मोबाईलवर ऑनलाईन क्लासची सवय झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेची पायरी चढण्याची इच्छाच नाही..
शाळेत जायला लागू नये, यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित असतात. मात्र, शाळेला सुटी मिळावी, यासाठी ओडिशातील एका विद्यार्थ्याने केलेले कृत्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.. नेमकं या विद्यार्थ्याने काय केलं, चला तर जाणून घेऊ या..
नेमकं काय घडलं..?
पश्चिम ओडिसातील बारगड जिल्ह्यातील बाटली ब्लॉकमधील कामगाव उच्च माध्यमिक विद्यालयातील वसतिगृहात हा प्रकार घडला. विद्यालयाने सुटी द्यावी, यासाठी कला शाखेत अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चक्क काही विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बाटलीत विष मिसळले..
बाटलीतील पाणी प्यायल्यानंतर या विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली, तरी त्यांना एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
याबाबत प्राचार्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ही विद्यार्थी 4 डिसेंबरला घरी गेला व 6 डिसेंबरला पुन्हा वसतिगृहात आला. मात्र, त्याला पुन्हा घरी जायचे होते. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण वाढल्यास सरकार पुन्हा लॉकडाऊन करील, असे त्याला वाटत होते.
विष मिसळून मित्रांना पाजले पाणी..!
दरम्यान, लॉकडाऊनची बाब निव्वळ अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने मित्रांना ‘काहीही करून कॉलेज बंद करणारच…’ असे सांगितले होते.. त्यातूनच त्याने बागेत वापरले जाणारे कीटकनाशक पाण्याच्या बाटलीत मिसळले. मात्र, पाण्याचा रंग बदलल्याचे पाहून काहींनी ते फेकून दिले, तर काही जण ते प्यायले.
विशेष म्हणजे, तो स्वत:देखील हे विषमिश्रीत पाणी प्यायला. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याचीही प्रकृतीही बिघडली. या विद्यार्थ्याला संभलपूर जिल्ह्यात उपचारासाठी रेफर करण्यात आले असता, कोणालाही न सांगता तेथून 48 किमी दूर असलेल्या घरी निघुन गेला.
चौकशीदरम्यान, शाळा बंद व्हावी, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितलेय. या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेत बैठक घेतली. या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, मुलाचे भविष्य पाहता, त्याला कडक ताकीद दिली असून, काही दिवसांसाठी निलंबित केले आहे.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018