मागील काही दिवसांपासून एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे, झूम कॉलवरुन एका कंपनीच्या ‘सीईओं’नी एका झटक्यात 900 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता.. मात्र, आता या ‘सीईओ’च्याही नोकरीवर गदा आलीय…!
विशाल गर्ग, असे या ‘सीईओ’चे नाव आहे.. ‘बेटर डाॅट काॅम’ (better.com) या कंपनीत ते ‘सीईओ’ आहेत. गर्ग यांनी मागील आठवड्यात झूम मीटिंगमध्ये 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकल्याचे जाहीर केले होते. माध्यमांतून हे प्रकरण समोर आल्यावर अनेकांनी गर्ग यांच्यावर टीकेची झोड उठवली..
अगदी उद्योगपती हर्ष गोयंका, तसेच आनंद महिंद्रा यांनीही या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर उपरती झालेल्या गर्ग यांनी या कर्मचाऱ्यांची माफीही मागितली.. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कंपनीने कारवाई केलीय.. नेमकं हे काय प्रकरण होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
नेमकं प्रकरण काय..?
‘बेटर डाॅट काॅम’ (better.com) ही अमेरिकन कंपनी.. न्यूयाॅर्कमध्ये या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.. या कंपनीचे ‘सीईओ’ (CEO)आहेत भारतीय वंशाचे विशाल गर्ग.. ही एक ‘सॉफ्ट बँकींग फायनान्स’ कंपनी आहे.. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी तोट्यात चालली होती..
अखेर कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला.. त्यासाठी गर्ग यांनी झूम मिटींग बोलवून अवघ्या 3 मिनिटांत 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्याचे जाहीर केले. कंपनीतील एकूण कर्मचारी संख्येच्या 9 टक्के कर्मचाऱ्यांना एका झटक्यात घरी बसविण्यात आले.
दरम्यान, झूम मिटींगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण जगासमोर आले. त्यानंतर जगभर विशाल गर्ग यांच्या नावाने बोंब ठोकण्यात आली.. अखेर त्यातून सावरण्यासाठी गर्ग यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली.
गर्ग यांनाही दाखवला घरचा रस्ता..
गर्ग यांच्या माफीनाम्यानंतरही हे प्रकरण शांत झालेले नाही. या प्रकारामुळे कंपनीचीही मोठ्या प्रमाणात बदनामी झाली.. अखेर कंपनीने गर्ग यांनाच घरी बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गर्ग यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. हे म्हणजे एका पद्धतीने त्यांना नोकरीवरुनच काढल्याचे मानलं जातंय.
आता ‘चीफ फायनान्शिअल ऑफिसर’ केव्हिन रेयान (CFO Kevin Ryan) हे कंपनीचे रोजचे निर्णय घेणार असून, बोर्डाकडे रिपोर्ट करणार आहेत. कंपनीच्या बोर्डाने लीडरशिप आणि कल्चरल असेसमेंटसाठी ‘थर्ड पार्टी इंडिपेंडंट फर्म’ची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018