SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महेंद्रसिंह धोनीला मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा दिलासा, मद्रास हायकोर्टाने याचिका फेटाळली..

भारतातील क्रिकेट रसिकांसाठी, विशेषत: महेंद्रसिंह धोनी याच्या फॅनसाठी मोठी बातमी आहे.. एका मॅच फिक्सिंग प्रकरणात या ‘कॅप्टन कुल’वर आलेले मोठे आरिष्ट दूर झालेय… त्यामुळे धोनीलाही (Mahendrasinh Dhoni) माेठा दिलासा मिळाला आहे…

टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन असणाऱ्या माहीचे नाव मॅच फिक्सिंग (Match fixing) प्रकरणात कसे, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना.. चला तर मग हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत जाणून घेऊ या..!

Advertisement

नेमकं प्रकरण काय…?
2014 मध्ये झालेल्या आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंग नि मॅच फिक्सिंगमध्ये महेंद्रसिंह धोनी याचाही सहभाग असल्याचा आरोप झाले होते. या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार हे करीत होते..

धोनीचा मानहानीचा दावा
दरम्यान, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना, धोनीने माध्यमांसह अन्य काही लोकांवर १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकला होता. त्यात तपासी अधिकारी जी. संपत कुमार यांच्यासह अनेक लोकांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Advertisement

एका टीव्ही मीडिया कंपनीसह काही लोकांनी मॅच, स्पॉट-फिक्सिंग, तसेच आयपीएल सामन्यांमधील सट्टेबाजीत आपण सामील असल्याचे सांगत बदनामीकारक बातम्या चालविल्या.

क्रिकेट चाहत्यांसमोर आपली प्रतिमा मलिन करण्याचा या प्रतिवादींचा उद्देश आहे. त्यामुळे माध्यमांसमोर तपासी अधिकाऱ्यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखावे, अशी मागणी धोनीने मद्रास हायकोर्टाकडे केली होती. कोर्टाने प्रतिवाद्यांना माध्यमांमध्ये कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई केली होती.

Advertisement

धोनीविरोधातील याचिका फेटाळली
दरम्यान, धोनीने आपल्याविरोधात ठोकलेला मानहानीचा दावा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी तपासी अधिकारी संपत कुमार यांनी २०१४ मध्ये मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

मद्रास हायकोर्टाने संपत कुमार यांची ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती एन. शेषसायी यांनी या प्रकरणावर निकाल दिला. ते म्हणाले, की ‘सध्या या प्रकरणावर कोणताही आदेश दिल्यास, २०१४ पासून जो मुख्य खटला सुरु आहे, त्याच्यावर प्रभाव पडू शकतो…!’

Advertisement

दरम्यान, मद्रास हायकोर्टाच्या निकालामुळे महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत धोनीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement