SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी होणार..; शिक्षण विभागाने घेतला पुस्तकांबाबत महत्वाचा निर्णय..!

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार, आता एकाच पुस्तकात 4 विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार असल्याचे सांगण्यात आले…

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा विषय समोर येत आहे.. हे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारही विविध उपाययाेजना करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय शिक्षण विभागाने एकाच पुस्तकात 4 विषयांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय..

Advertisement

सुरुवातीला पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीच हा प्रयोग राबविला जाणार आहे.. त्यानंतर हळुहळू सर्व प्राथमिक वर्गांसाठी हा निर्णय लागू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले..

सत्रनिहाय एकच पुस्तक
पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे इंग्रजी, मराठी, गणित नि खेळा आणि शिका, या चार विषयांचा समावेश एकाच पुस्तकात केला जाणार आहे.. प्रत्येक सत्रासाठी वेगळे पुस्तक असेल. विद्यार्थ्यांना सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे प्रत्येक वेळी केवळ एकच पुस्तक आणावे लागणार आहे..

Advertisement

‘बालभारती’चे संचालक विवेक गोसावी म्हणाले, की ”राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून एकच पुस्तक आणले जाईल. त्यानंतर पुढील वर्षापासून सर्व प्राथमिक वर्गासाठी हा निर्णय लागू केला जाणार आहे..”

आम्हाला हे पाठ्यपुस्तक वापरणारे विद्यार्थी नि शिक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

पुस्तकांचे ओझे 210 ग्रॅमने कमी होणार
“पहिलीतील 6 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत किमान 830 ग्रॅम वजनाचे दप्तर असते. शिवाय त्यात पाण्याची बाटली, जेवणाचा डब्बा नि वह्या-पुस्तकांमुळे बॅगेचे एक वजन 1 किलोच्या वर जाते. मात्र, आता सगळ्या विषयांसाठी एकच पुस्तक आणल्याने दप्तराचे वजन 210 ग्रॅमपर्यंत कमी होणार आहे..”

सध्या प्रायोगिक तत्त्वावर 488 मॉडेल स्कूलमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. या शाळांमध्ये अशी पुस्तके देण्यात आली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

Advertisement

दुर्गम भागातील शाळा खूप दूर दूर असतात. तेथील विद्यार्थ्यांना दप्तराने भरलेल्या जड पिशव्या घेऊन चालत शाळांमध्ये ये-जा करावी लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय फार उपयुक्त ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement