SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो.. पहिले हे काम करा, नाहीतर दोन हजार रुपये अडकणार, पीएम किसान योजनेचे नियम बदलले..!

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा 10 वा हप्ता या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे… मात्र, त्याआधी मोठी बातमी समोर आलीय.. पीएम किसान योजनेच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे..

पीएम किसान योजनेंतर्गत १० व्या हप्त्याचे 2000 रुपये 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मोदी सरकारने यादीही जाहीर केली आहे. मात्र, तत्पूर्वीच नियमांत बदल झाल्याची बातमी समोर आलीय..

Advertisement

नियमांत काय बदल…?
पीएम किसान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे, केंद्र सरकारने हा नियम बंधनकारक केला आहे..

शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन, आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण करावे लागणार आहे. घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया करता येणार आहे.

Advertisement

पीएम किसान योजने अंतर्गत नोंदणीदरम्यान ई-केवायसी केलेले नसेल, किंवा ई-केवायई (eKYE) केले नसेल, तर 2000 रुपयांच्या हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ‘ई-केवायसी’ नेमके कसे करायचे, याबाबत जाणून घेऊ या…

अशी करा ‘ई – केवायसी’..
– सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा. त्यावरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.
– येथे तुम्हाला ई-केवायसी (eKYC) या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– नंतर तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल.
– त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटोपी (OTP) टाका.
– सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण न झाल्यास स्क्रीनवर ‘इनव्हॅलिड’ (Invalid) लिहिलेले दिसेल.

Advertisement

हप्ता अडकण्याची भीती
शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया न केल्यास किंवा ही प्रक्रिया अवैध झाल्यास हप्त्याचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुम्हाला दुरुस्ती करता येईल. केंद्र सरकार लवकरच यावर्षीचा पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता देणार आहे.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement