SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आहे का? घरबसल्या कशी बुक करायची वाचा..

देशात अनेक राज्यात 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट (High security number plate) असणे अनिवार्य झाले आहे. तुम्हीही अद्याप आपल्या वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नसेल, तर ती लावणं फायद्याचं आहे. अशी नंबर प्लेट तुम्ही कोणताही वेळ न घालवता घरी बसून हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट ऑनलाईन मिळवू शकता.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेटविषयी…

Advertisement

वाहनाची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसिस नंबर असतो. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाला जोडलेली असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते आणि आणि एकाही बाजूने उघडणार नाही.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट आवश्‍यक..!

Advertisement

परिवहन मंत्रालयाने (Ministry of Transport) 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक केले होते, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत, चलन येतच राहतात. नियम मोडल्यास परिवहन विभाग फिटनेस, नोंदणी नूतनीकरण आणि परमिटवर बंदी घालू शकतो. त्यामुळे 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन ऑर्डर कशी करावी?

Advertisement

तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल, iOS ऍप स्टोअर किंवा Android वापरकर्ता असाल तर तुम्हाला हाय सिक्‍युरिटी नंबरची नोंदणी करायची असल्यास Google Play Store वरून BookmyHSRP ॲप डाऊनलोड करा. या ऍपद्वारे तुम्ही नवीन नंबर प्लेटची नोंदणी, रिअल टाइम शिपमेंट ट्रॅक, ऑर्डर रद्द करणे, परतावा अशा पर्यायाची निवडू करू शकता.

तसेच, https://www.bookmyhsrp.com/Index.aspx या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही ही नंबर प्लेट बुक करू शकता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार विशिष्ट रंगाचा स्टिकर लावणं अनिवार्य केलं आहे. हलक्या निळ्या रंगाचे स्टिकर पेट्रोल आणि CNG वाहनांसाठी निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना केशरी रंगाचे स्टिकर्स लावणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आहे.

Advertisement

देशातील कार अँड बाईक सर्व्हिस एग्रीगेटर रास्ता ऑटोटेकने (Rasta Autotech) BookmyHSRP सोबत करार केला आहे, जो सुरुवातीस दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) वितरण सेवांचा समावेश करणार आहे. रास्ता ऑटोटेकचे संस्थापक आणि एमडी कर्ण नागपाल यांनी म्हटलं की, आम्हाला BookmyHSRP सोबत भागीदारी जाहीर झाल्याचा आनंद होत आहे, आमच्या ग्राहकांसाठी नंबर प्लेट नोंदणीची प्रक्रिया आमच्या कंपनीसाठी आणखी सुलभ होणार आहे, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement