SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोण होते सीडीएस बिपीन रावत? जाणून घ्या रावत यांची संपूर्ण कारकीर्द!

काल तामिळनाडूतील कुन्नूरजवळ भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या सोबत एकूण 13 अधिकाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेने ट्विट करून सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हौतात्म्याची पुष्टी केली असून सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एनडीचे विद्यार्थी ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ इथपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास कसा होता ते थोडक्यात जाणून घेऊया…

जाणून घ्या रावत यांची संपूर्ण कारकीर्द….

Advertisement

▪️ रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने त्यांचं बालपण देखील लष्करी शिस्तीमध्येच गेलं.

▪️ बिपिन रावत (Bipin Rawat) 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. यानंतर त्यांची आता सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बिपीन रावत यांनी 1 जानेवारी 2020 पासून या नवीन पदाचा पदभार स्वीकारला होता.

Advertisement

▪️ 30 डिसेंबर रोजी सरकारने सीडीएस Chief Of Defence Staff) पदासाठी लष्कराच्या नियमांमध्ये बदल करून वयोमर्यादा 65 वर्षे केली आहे. त्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली होती. सीडीएस बनण्यापूर्वी बिपिन रावत 27 वे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुख बनण्याआधी, 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांची भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

▪️ रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ ठरले. रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना आता पर्यंत गौरवण्यात आलं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement