SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ब्लॅक बॉक्स’मुळे उलगडणार हेलिकाॅप्टर अपघाताचे गुढ..! ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय, इतिहास नि महत्व वाचा..

तमिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात देशाचे पहिले ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी ‘ब्लॅक बॉक्स’ मिळाला असून, त्याद्वारे या अपघाताचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही-५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयात (डीएसएससी) एका कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. त्यातून केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Advertisement

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) ताब्यात घेतलाय. त्यामुळे या दुर्घटनेचे कारण समजण्यास मदत होणार आहे. यानिमित्त ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय, त्याचा इतिहास नि महत्व समजून घेऊ या..

‘ब्लॅक बाॅक्स’ म्हणजे काय…?
विमानाचा वा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ शोधला जातो. विमान किंवा हेलिकाॅप्टरमध्ये ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (FDR) ज्यात आकडेवारी दिलेली असते, तसेच ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ (CVR)मध्ये संभाषण रेकॉर्ड केले जाते, त्याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणतात.

Advertisement

‘ब्लॅक बाॅक्स’चा इतिहास..
१९५०च्या दशकात ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी ‘ब्लॅक बॉक्स’चा शोध लावला. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करताना ‘कमर्शिअल एअरक्राफ्ट’चा अपघात झाला होता.

विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येतील का, असा विचार करुन त्यांनी ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’वर काम करायला सुरुवात केली नि ‘ब्लॅक बॉक्स’चा शोध लागला.

Advertisement

दरम्यान, १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ बसविला होता. भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमाने नि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.

‘ब्लॅक बाॅक्स’चे महत्व..
– ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे त्याचा रंग ‘काळा’ असेल असे वाटेल, मात्र या बॉक्सचा रंग ‘केशरी’ असतो.
– ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या कठिण गोष्टींनी बनविलेला असतो, की त्याच्यावर आग, पाणी कशाचाच परिणाम होत नाही.

Advertisement

– विमानाच्या मागील भागात तो बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते.
– ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमता अतिशय चांगली असून, ती ३० दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

– विमान निर्माण करणाऱ्या टीमकडून ब्लॅक बॉक्सच्या अनेक चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच तो विमानात बसविण्यात येतो.
– दुर्घटनेनंतर ‘ब्लॅक बॉक्स’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणे समजतात.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement