SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

2021 मध्ये गुगलवर ‘हा’ शब्द सर्वाधिक सर्च..! हा चित्रपट राहिला आघाडीवर..!

‘गुगल’.. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन.. अगदी छोट्यात छोट्या गोष्टीची माहितीही ‘गुगल’वर (Google) हमखास मिळतेच.. स्मार्टफोन हातात आल्यापासून तर या ‘सर्च इंजिन’चा सर्वाधिक वापर हाेऊ लागलाय.. अगदी चुटकीसरशी समस्या सुटत आहेत..

2021 सालातील अखेरचा डिसेंबर महिना सध्या सुरु आहे.. यानिमित्ताने अनेक जण आपल्या वर्षभरातील कामाचा धांडोळा घेतात. वर्षभरात आपण काय कमावलं, काय गमावलं, याचा लेखाजोखा मांडतात. त्यातून पुढची वाटचाल ठरवतात..

Advertisement

‘गुगल’नेही असाच धांडोळा घेतलाय.. म्हणजेच गेल्या वर्षभरात ‘गुगल’वर सर्वाधिक काय ‘सर्च’ करण्यात आलं, याची माहिती गुगलने घेतलीय.. त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…

‘गुगल’वर ‘हा’ शब्द सर्वाधिक सर्च..
‘गुगल’वर लोकांनी वर्षभरात सर्वाधिक सर्च (Year in Search) केलेल्या शब्दांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भारतीयांना क्रिकेटचे किती वेड आहे, हे समोर आले आहे. कारण गेल्या वर्षभरात सर्वाधिक लोकांनी ‘आयपीएल’ (Indian Premier League) हा शब्द सर्च केल्याचे समोर आलेय.

Advertisement

या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील शब्द आहे, ‘कोविन’ (Cowin).. तर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा भारतीयांचे क्रिकेट प्रेम दिसून आले. कारण, तिसऱ्या क्रमांकावर ‘टी-20 वर्ल्ड कप’ (ICC T20 World Cup) हा शब्द असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे..

भारतीयांनी फुलबॉलदेखील मोठ्या प्रमाणात शोधल्याचं दिसतंय, कारण या यादीत ‘युरो कप’ (Euro Cup) हा शब्द चौथ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

पर्सनालिटी लिस्टमध्ये..
पर्सनलिटी लिस्टमध्ये ‘गोल्डन बॉय’ नीरज चोपडा यास सर्वाधिक सर्च केलं गेलं. दुसऱ्या क्रमांकावर ‘किंग खान’ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सर्वाधिक सर्च करण्यात आलंय.

कोविडबाबत..
गेम लिस्टमध्ये सर्वाधिक ‘फ्री फायर’ (Free Fire) हा गेम सर्च केला गेला. कोरोनासंबंधी ‘नियर मी’ (Near Me) सर्वाधिक सर्च केलं गेलं. अनेकांनी व्हॅक्सिन, कोविड टेस्ट, कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन सिलिंडर नि सीटी स्कॅन सर्च केलं. टिफिन सर्विसही सर्वाधिक शोधलं गेलंय.

Advertisement

पॅन कार्ड व आधार लिंकिंग
गुगलवर ‘हाऊ टू’ (How to..) मध्ये भारतीयांनी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची पद्धत सर्च केलीय. गुगल ट्रेंडनुसार 28 मार्च ते 3 एप्रिल 2021 दरम्यान भारतात पॅन कार्ड हे आधारशी लिंक कसे करायचे, हे सर्वाधिक शोधण्यात आले..

‘जय भीम’ आघाडीवर..
चित्रपटांमध्ये तमिळ ब्लॉकबस्टर जय भीम (Jai Bhim) मूव्ही टॉप लिस्टमध्ये होता. त्यानंतर बॉलिवूड मूव्ही ‘शेरशहा’ सर्वाधिक सर्च केला गेला..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement