SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…तर तुमचे सिमकार्ड होऊ शकते बंद, सरकारचा नवीन प्लॅन काय?

देशात कोणाकडे ऑफिससाठी, घर आणि एक पर्सनल वापरासाठी असे दहा- बारा सिमकार्ड वापरले जात असल्याचेही दिसून येते. पण आता असं कमी होणार आहे. दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) 9 पेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांच्या सिमची पुन्हा पडताळणी करण्याचे आणि पडताळणी न झाल्यास सिम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

देशातील जम्मू आणि काश्मीर सोबतच आसाम व ईशान्य बाजूस असणाऱ्या राज्यांत खूप प्रमाणात सिम वापरली जात आहे. ही संख्या 6 सिम कार्डची आहे. जर समजा पडताळणीत जास्त सिमकार्ड आढळून आले, तर सिमकार्ड बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

दूरसंचार विभागाने दिले आदेश…

दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) जारी केलेल्या आदेशानुसार, ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास, त्यांना त्यांच्या आवडीचे सिम सुरू ठेवण्याचा आणि इतर सिम बंद करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

Advertisement

दूरसंचार विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जर एखाद्या ग्राहकाकडे सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विहित (नियमानुसार) संख्येपेक्षा जास्त सिम कार्ड असल्याचे आढळले, तर सर्व सिमची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना वापरात नसलेल्या सिमबाबत कारवाई करण्यास सांगितलं आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमानुसार वापरात नसलेले सर्व मोबाईल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

Advertisement

ऑनलाईन फसवणूक थांबणार का?

देश एकीकडे डिजिटल होताना फायदे खूप असले, तरी याचा गैरफायदा घेणारे किंवा सायबर क्राईम करणारे काही चोर आहेत. अशा काही आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांचा तपासवेग वाढवण्यासाठी आणि असे गुन्हे कमी होण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

तुम्हाला माहीतच असेल, की लोकांच्या ऑनलाईन फसवणुकीसाठीही अनेक सायबर क्रिमिनल लोकांना ओटीपी विचारतात आणि त्याआधारे फसवणूक करतात आणि पैसे अकाउंटमधून काढून सिमकार्ड वापरून फेकून देतात. अशा व इतर काही आजकाल घटना सर्रास घडत असतात. मात्र, आता एका व्यक्तीच्या नावे किती सिमकार्ड असावेत, याबाबत दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) नवीन आदेश काढले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement