SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एचआयव्ही’वर सापडले प्रभावी औषध, भारतीय संशोधकांना आले मोठे यश…

जगात असे काही दुर्मिळ, दुर्धर आजार आहेत, की त्यावर अद्याप कोणताच उपाय सापडलेला नाही.. त्यामुळे या आजारांवर मात करता आलेली नाही.. अशाच आजारांपैकी एक म्हणजे एचआयव्ही (HIV)…

प्रत्‍येक देशातील लोक ‘एचआयव्‍ही’ने बाधित आहेत.. दिवसेंदिवस हा आजार म्हणजे जागतिक संकट झालेय. भारतातही गेल्या काही दिवसांत या आजाराने आपले हातपाय पसरले आहेत. या आजारावर रामबाण उपाय शोधण्याचे काम जगभरातील शास्रज्ञ, वैज्ञानिक करीत आहेत..

Advertisement

‘एचआयव्ही’ बाधितांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.. भारतातील संशोधकांनी या आजारावर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढल्याचा दावा केला आहे. बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (IISC Bengaluru) संशोधकांनी हे औषध शोधले आहे..

कोणते औषध शोधले..?
इंग्लडमधील प्रसिध्द ई-लाईफ जर्नल (Elife Journal)मध्ये या शास्रज्ञांनी केलेले संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार, ‘हायड्रोजन सल्फाइड वायू’च्या (Hydrogen Sulphide) मदतीने ‘एचआयव्ही’ रुग्णांवर उपचार केल्यास ‘एचआयव्ही’ विषाणूंची वाढ होण्यापासून थांबवता येईल, असा दावा केला आहे.

Advertisement

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील (आयआयएससी) ‘मायक्रो-बायोलॉजी’ आणि ‘सेल बायोलॉजी’ विभागातील संशोधक, तसेच बंगळुरु मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक या अभ्यासात सहभागी झाले होते..

संशोधक काय म्हणतात..?
‘एचआयव्ही’ रुग्णांवर ‘हायड्रोजन सल्फाइड’च्या मदतीने उपचार करता येतील. ‘हायड्रोजन सल्फाइड’ थेट ‘एचआयव्ही’ विषाणूंवर हल्ला करतील, त्यामुळे हे विषाणू वाढू शकणार नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Advertisement

‘एचआयव्ही’ विषाणूवरील उपचारासाठी सध्या वापरली जाणारी ‘अँटी रेट्रोव्हायरल थेरपी’ (ART) मुळे आजार पूर्ण बरा होत नाही. मात्र, ‘हायड्रोजन सल्फाइड’च्या माध्यमातून ‘एचआयव्ही’विरूद्ध प्रभावी भूमिका बजावणारी ‘अँटी रेट्रोव्हायरल थेरपी’ विकसित करता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सध्या ‘एआरटी’ची कमतरता लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी ‘हायड्रोजन सल्फाइड’चा प्रभाव तपासण्याचा प्रयत्न केला असता, एचआयव्ही विषाणूंना तो निष्क्रिय करण्यास सक्षम असल्याचे समोर आले. शिवाय विषाणूची पुनरुत्पादनाची क्षमता कमी होत असल्याचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रा. अमित सिंग म्हणाले.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement