भारतात सध्या फक्त काहीशे लोक असतील ज्यांच्याकडे बाईक अर्थात दुचाकी नसेल. जशी गरज, पैसा तशी हौस आणि बाईक, चार चाकी गाडी लोकांकडे असते. वेळ वाचावा म्हणून यातील काहीतरी आपल्या जवळ असणं गरजेचं असतंच, हे आपण समजू शकतो. अत्यावश्यक वेळी अशीच वाहने आपल्याला उपयोगी पडतात.
तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत आहात आणि तुमचे बजेटही एक लाख रुपयांच्या (Bike budget range 50000-100000 rupees) आसपास असेल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
बजेटमध्ये असणाऱ्या काही खास बाइक्स..
1) TVS Apache RTR 160
TVS Apache RTR 160 ही बाईक तुम्हाला 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये एक चांगला ऑप्शन आहे. या बाईकची किंमत 1,07,865 हजार रुपयांपासून असून खास तरुण वर्गासाठी कंपनीने ही बाईक डिझाईन केली आहे आणि स्टाईल व बेस्ट परफॉर्मंसही ही बाईक देते.
2) बजाज पल्सर 150
बजाजची ही पल्सर बाईक ही सर्वच वापरू शकतात, अशी आहे. बजाज पल्सर 150 (Bajaj Pulsar 150) ही देखील या बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. सुरुवातीला ही बाईक खास डिस्क ब्रेक आणि सस्पेंशनमुळे चांगली ओळखली गेली. शोरूममध्ये त्याची किंमत 99,418 रुपये असू ही बाईक खूपच प्रसिध्द आहे.
3) होंडा शाइन 125
देशातील Honda कंपनीच्य स्कूटर आणि 125 cc इंजिन असलेली Honda shine 125 बाईक तुम्हाला या बजेटमध्ये खरेदी करता येते. या बाईकची किंमत 73,352 रुपयांपासून सुरु होते. यातही तुम्हाला ब्रेकच्या प्रकारानुसार 5000 रुपयांच्या आसपास कमी किंवा जास्त पैसे लागू शकतात.
4) Hero Xtreme 160R
हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ची बाईक Hero Xtreme 160R ही बाईकही काही कमी मायलेजची नाहीये. या बाईकची किंमत 1,11,610 रुपयांपासून सुरु होते. देखील एक बेस्ट पर्याय आहे. आजकाल मायलेज जास्त असलेल्या गाड्या आपण बघतो पण त्या बैठकीस कशा आहेत हेही पाहून घ्या.
5) हिरो ग्लॅमर 125
बाईकची इंजिन कॅपॅसिटी जास्त मायलेज तेवढं कमी असते गे आपल्याला माहीतच असेल. जर तुम्ही 125cc ची बाइक शोधत असाल तर Hero MotoCorp ची बाइक Hero Glamour 125 देखील एक चांगला ऑप्शन आहे. या बाईकची सध्याची किंमत सध्या 77,700 रुपये आहे.
6) होंडा युनिकॉर्न BS-6
तुम्ही बसण्यासाठी आरामशीर वाटावी अशी आणि क्विक रिस्पॉन्ससाठी (पिकअप) होंडाची बाईक Honda Unicorn BS-6 देखील एक लाख रुपयांच्या रेंजमध्ये एक उत्तम पर्याय आहे. या बाईकची किंमत 99,987 रुपये आहे.
(बाईकच्या या किंमतीत वेळेनुसार यानंतरही वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. अचूक किंमतीसाठी तुमच्या शहरातील बाईक शोरूम्सला भेट द्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018