SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुनप्रकरणातील आरोपी मंदिरात महाराज बनून राहिला.. पोलिसांनी त्याचा बनाव उघड केला..!

एका पत्रकाराच्या खूनातील तो प्रमुख आरोपी.. नंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. बराच दिवस इकडे-तिकडे भटकला नि मग चक्क महाराज होऊन देवपूजेला लागला.. मंदिरात राहू लागला.. मात्र, ‘कानून के हाथ लंबे होते है..’ चा प्रत्यय त्यालाही आला नि पुन्हा एकदा त्याच्या हातात बेड्या पडल्या..

कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अ.नगर) असे या आरोपीचे नाव आहे.. आरोपी मोरे याचा बनाव उघड करण्यात पोलिसांना यश आले.. या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकी घटना काय..?
राहुरी येथे ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले होते.. नंतर बेदम मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत कान्हू मोरे हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले..

घटनेनंतर तो पसार झाला हाेता. मात्र, पोलिसांनी त्याला घटनेनंतर 12व्या दिवशी, म्हणजेच १८ एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले..

Advertisement

दरम्यान, तेथे मूतखड्याचा त्रास सुरु झाल्याने त्याला पुण्याला हलविण्याचे ठरले. त्यासाठी त्याला ॲम्बुलन्समध्ये बसविले असतानाच, ॲम्बुलन्स चालकाला हृदयविकाराचा झटका आला. या सगळ्या गोंधळात लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोरे याने धूम ठोकली.

याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस नाईक भगवान किसन पालवे व गणपत जयवंत झरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.. तोफखाना पोलिस ठाण्यात मोरे याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिस आरोपी मोरे याचा कसून शोध घेत होते.

Advertisement

तब्बल 5 महिने फरार
तब्बल पाच महिने पोलिसांना त्याचा शोध घेतला. आजारी असल्याने तो कुठल्या तरी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तरी येईल, या शक्यतेमुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास केला. तो मध्य प्रदेशातील बडवा जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, मोरेचेही खबरे होते.

पोलिस मध्य प्रदेशमध्ये आल्याची माहिती खबऱ्यांकडून समजताच त्याने तेथूनही पळ काढला. त्याला मदत करणारे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) व सतीश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द, ता. राहूरी) यांना पोलिसांनी अटक केली.

Advertisement

तेथून तो पुन्हा एकदा राहुरीला आला.. गुहा फाट्याजवळील मळगंगा देवीच्या मंदिर परिसरात वेशांतर करून महाराज म्हणून राहू लागला. मात्र, अखेर त्याचे बिंग फुटले.. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली..

पोलिसांना मंदिराभोवती सापळा रचून अखेर मोरे याला जेरबंद केले. पुढील कारवाईसाठा त्याला नगरच्या तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement