SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खतांच्या किंमती आणखी कमी होणार? शेतकऱ्यांना होईल फायदा, सरकार करतंय ‘हा’ विचार…

देशात खतांच्या किंमती कमी होण्याची चिन्हे आहेत. सरकार खताच्या अनुदानात 62 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे. म्हणून लवकरच खतांच्या किंमती या कमी होऊ शकतात. ही बातमी नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

‘क्रिसिल’ने केलेल्या दाव्यानुसार….

Advertisement

नैसर्गिक गॅस (Natural Gas) व इतर कच्च्या मालाच्या किंमतीत बरीच वाढ झाली आणि त्यामुळे खताचे दर अधिक आहेत. यामुळेच खताचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करता केंद्र सरकारकडून खतावर देण्यात येणारे अनुदानही वाढू शकते, अशी दाट शक्यता आहे.

या दाव्यानुसार, देशात चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारकडून खतांसाठी 79530 कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले होते. आता या अनुदानामध्ये समजा वाढ जर झाली तर ते 1 लाख 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास जाऊ शकते. या अनुदानामध्ये वाढ झाल्यास खताचे दर आधीपेक्षाही स्वस्त होऊ शकतात.

Advertisement

अनुदानात जर अधिकची वाढ केली तर खताचे भाव आता असलेल्या किंमतीपेक्षा आणखी 10 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. खताचे दर वाढले, तर त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे खताचे दर नियंत्रणात कसे ठेवता येतील यावर सरकार प्रयत्न करत असतं. चालू आर्थिक वर्षात सरकारकडून खतावर आतापर्यंत 21328 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे.

नैसर्गिक गॅसच्या किमतीत चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. खताच्या तयार होण्यामागे नैसर्गिक गॅसचा सत्तर ते पंचाहत्तर टक्के वाटा असतो. त्यामुळे खताच्या किंमती देखील वाढल्या आहेत. नैसर्गिक गॅससोबतच खते बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल फॉस्फरस आणि अमोनियाचे दर सुद्धा चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढलेत. सरकारकडून खतांसाठी देण्यात येणारे हे अनुदान नॉन-यूरिया खतांसाठी देण्यात येत असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement