SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ बड्या नेत्याची मुलगी होणार ठाकरे घराण्याची सून, ‘या’ तारखेला होणार लग्नसोहळा…

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चांगलीच चर्चा चालली होती.

हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या नव्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असे कॅप्शन दिले आहे.

Advertisement

आता हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे राजकीय संबंधातून हे लग्न जमलेलं नाही. सुरुवातीला ही भेट राजकीय असल्याचं वाटत होतं. पण आपण मुलीच्या लग्नाचं आमंत्रण आणि लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलतकाका आहेत.

Advertisement

अंकिता यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं असून 1 वर्ष त्या हार्वर्डमध्ये शिकण्यास होत्या. याचवेळी निहार हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेथेच दोघांची ओळख झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आता अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला दोन्ही बाजूंच्या आप्तेष्टांनी होकार दिला आहे. अंकिता पाटील या काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, तर हर्षवर्धन पाटील हे मूळचे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात असले, तरी ते सध्या भाजपात आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement