SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : कोहलीला वन-डे कर्णधार पदावरुन हटवले, रोहित शर्माकडे नेतृत्व, आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर

भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता त्याच्याकडून वन-डे संघाचेही कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

विराट कोहली ऐवजी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडेच आता भारतीय टी-20 आणि वन-डे संघांचेही नेतृत्व देण्यात आले आहे… त्यामुळे विराट कोहली आता फक्त टेस्टसाठीच टीम इंडियाचा कॅप्टन असणार, हे स्पष्ट झाले आहे..

Advertisement

वनडे आणि टी-20 संघांसाठी वेगवेगळा कर्णधार नसावा, असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे रोहितकडे वन-डे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. 2023 च्या वर्ल्ड कपला फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे संघ तयार करण्यासाठी रोहितला पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला.

रोहितने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी आठ सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता टी-20 आणि वन-डेसाठी उपकर्णधार कोण होणार ? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Advertisement

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. तसेच अजिंक्य रहाणे याच्याऐवजी आता रोहित शर्मा याला टेस्टसाठी उपकर्णधार केले आहे.

टेस्टसाठी असा असेल संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट कीपर), रिद्धिमान साहा (विकेट कीपर), आर. अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मो. सिराज.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement