SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाच्या निवडीवरुन कोहली-द्रविड व निवड समितीत खटकले, या खेळाडूंवर सारे अडले..!

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट व 3 वन-डे सामने खेळणार आहे. ‘बीसीसीआय’ने टी-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे..

दरम्यान, कसोटी मालिकेसाठी मंगळवारीच (ता. 7) टीम इंडियाची घोषणा केली जाणार होती. मात्र, काही खेळाडूंच्या निवडीवरुन कॅप्टन विराट कोहली, मुख्य कोच राहुल द्रविड यांचे निवड समितीसोबत मतभेद झाल्याचे वृत्त समोर येत आहे.. त्यामुळे संघाची निवड लांबणीवर गेली आहे.

Advertisement

एका वृत्तानुसार, सध्या खराब फॉर्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना निवड समिती आणखी एक संधी देण्याच्या विचारात आहे. मात्र, इशांत शर्माची निवड त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

इशांत शर्मा याच्या जागी दुसऱ्या तरूण खेळाडूला संधी देण्यासाठी निवड समिती आग्रही आहे.. तर विराट कोहली व द्रविड यांनी अनुभवी इशांतच्या निवडीवरच ठाम असल्याचे समजते.

Advertisement

भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. टीम इंडियाला आजवर कधीही दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. हा डाग पुसण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल..

रहाणे-पुजारावर विश्वास कायम
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या दोघांवर आजही कॅप्टन कोहली व कोच द्रविड यांचा पूर्ण विश्वास आहे. या दौऱ्यात या दोघांचा फॉर्म परत येईल, असे या दोघांना वाटते. दक्षिण आफ्रिकेत रहाणेची टेस्ट सरासरी 53, तर पुजाराची 31 सरासरी राहिली आहे.

Advertisement

इशांत शर्मा याने आजवर दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 7 टेस्टमध्ये फक्त 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे रहाणे व पुजारा यांना पुन्हा संधी देण्यास निवड समिती तयार आहे. मात्र, इशांत शर्मा याच्या निवडीवरुन सध्या मतभेद झाल्याचे समोर आले आहे…

दरम्यान, कसोटी मालिकेनंतर 19 जानेवारीपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी नंतर संघाची घोषणा केली जाणार आहे.. विजय हजारे स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्यांची वन-डे संघात निवड होऊ शकते.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement