SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच करा अर्ज..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी नोकरभरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (IIPS Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. कोणत्या जागांसाठी ही भरती होतेय, त्यासाठीची पात्रता व अर्ज कसा करायचा, याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

या पदांसाठी भरती..
मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer)
वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant)
उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk)
ग्रंथालय लिपिक (Library Clerk

शैक्षणिक पात्रता व अनुभव
मुख्य प्रशासकीय अधिकारी – किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण, विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतरत्र किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आवश्यक.

Advertisement

वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलंलं असावं. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

उच्च विभाग लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी

Advertisement

ग्रंथालय लिपिक –  दहावीपर्यंत शिक्षण, तसेच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे
बायोडेटा
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

Advertisement

अर्ज पाठवण्याचा पत्ता
डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022

Advertisement

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी क्लिक करा-  https://www.iipsindia.ac.in/

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement