SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता प्रत्येकाचे होणार हक्काचं घर..! मोदी सरकारकडून या योजनेला मुदतवाढ..

आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं हक्काचं घरटं.. त्यासाठी अनेक जण पोटाला चिमटा घेऊन पै पै गोळा करतात.. अशा लाेकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सरकारही मदतीचा हात देत असते..

सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी मोदी सरकारने योजना सुरु केली होती.. प्रधानमंत्री आवास योजना, असे या योजनेचे नाव.. 2015 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत नागरिकांना घरे बांधण्यासाठी मोदी सरकारकडून अनुदान देण्यात येते..

Advertisement

घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. ती म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवली जाणार आहे.. त्यानुसार आता या याेजनेसाठी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (ता. 8) बैठक झाली. त्यात ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारचे एकूण 2.95 कोटी घरांचे उद्दिष्ट आहे. पैकी 31 मार्च 2021 पर्यंतच्या उर्वरित 155.75 लाख घरांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे.

Advertisement

बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत 1.65 कोटी पक्की घरे देण्यात आली आहेत. घराच्या बांधकामासाठी निधी दिला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा एकूण 1,43,782 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Advertisement

देशात 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत उद्दिष्टांपैकी 1.65 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित घरांचे बांधकाम 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे 2.95 कोटी घरांचे एकूण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांचा काय फायदा..?
मार्च 2024 पर्यंत योजना सुरू ठेवल्यामुळे ग्रामीण भागात ‘सर्वांसाठी घरे’ उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2.95 कोटी घरांच्या एकूण उद्दिष्टापैकी मूलभूत सुविधांसह उर्वरित 155.75 लाख पक्की घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement