भारतीयांसाठी एक दु:खद बातमी आहे.. भारतीय हवाई दलाच्या ‘IAF MI 17’ हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात पहिले सीडीएस जनरल (संरक्षण प्रमुख) बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले..
तमिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कन्नुर येथील निलगिरी जंगलात बुधवारी (ता. 8) हवाई दलाचे ‘IAF MI 17’ हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.. या घटनेची चौकशी करण्याच आदेश हवाई दलाने दिले आहेत..
With deep regret, it has now been ascertained that Gen Bipin Rawat, Mrs Madhulika Rawat and 11 other persons on board have died in the unfortunate accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
Advertisement
तमिळनाडूतील वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात लेक्चर देण्यासाठी गेले होते. तेथून ते कुन्नूरकडे जात होते. कुन्नुरहून त्यांना दिल्लीला जायचं होतं. मात्र, खराब हवामानामुळे कन्नुरच्या घनदाट जंगलात त्याचे हेलिकाॅप्टर कोसळले.
हेलिकाॅप्टरमधून रावत यांच्यासह 14 जण प्रवास करीत होते.. कुन्नूरच्या घनदाट जंगलात हे हेलिकाॅप्टर कोसळले. पेटलेल्या हेलिकाॅप्टरमुळे जंगलालाही आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच, हवाई दल आणि लष्कराची पथके घटनास्थळी दाखल झाले.
तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. हवाई दलाने तसे जाहीर केले आहे..
सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल आदींचा त्यात समावेश आहे.
बिपीन रावत यांच्याविषयी..
बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडूनमध्ये झाला. त्यांचे वडील एल. एस रावत हेदेखील लष्करातच होते.. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला. अकादमीत त्यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हे पहिलं सन्मानपत्र मिळालं होतं.
नंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले. तेथून परतल्यानंतर १६ डिसेंबर १९७८ रोजी ते लष्करात भरती झाले. लष्करातील विविध पदांवर त्यांनी काम केलं. लष्करी सेवेदरम्यान त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
ते देशाचे 26 वे लष्करप्रमख होते. लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होण्याच्या दिवशीच ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांची संरक्षण प्रमुखपदी निवड झाली होती. तिन्ही संरक्षण दलांत समन्वय साधण्यासाठी हे पद (चीफ ऑफ डिफेन्स) तयार करण्यात आले होते. ते पहिलेच ‘सीडीएस’ होते..
👉 भारताचे पहिले संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांना ‘स्पेडइट’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…!
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018