मोदी सरकारने 5 वर्षांपूर्वी नोटाबंदीची घोषणा करताना 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर मोदी सरकारने चलनात नव्याने 2000 रुपयांची नोट आणली होती.
गेल्या काही दिवसांपासून बाजारातून ही 2000 रुपयांची नोटही दिसेनाशी झाली आहे.. त्यामुळे 2021 मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा नोटाबंदी करणार का..? 2000 रुपयांच्या नोटाही चलनातून बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली होती…
मोदी सरकारने आज (ता. 8) या 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात नोटांची संख्या कमी का झाली, या मागील कारणही स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली..
ते म्हणाले, की “‘आरबीआय’च्या सल्ल्याने विशेष मूल्यांच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार घेत आहे. शिवाय लोकांचे व्यवहार आणि मागणी लक्षात घेऊन नोटांची उपलब्धता वाढवली किंवा कमी केली जाते.”
“मार्च-2018 मध्ये बाजारात चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या 3363 कोटी होती. ही संख्या नोव्हेंबर-2021 मध्ये 2233 दशलक्ष नोटांवर आली. एकूण नोटांच्या (NIC) तुलनेत ही संख्या 1.75 टक्के आहे, म्हणजेच आता बाजारात 2000 रुपयांच्या नोटांमध्ये घट झालीय,” असे ते म्हणाले..
कशामुळे नोटा कमी झाल्या..?
2018-19 पासून दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट (मागणी पत्र) ठेवण्यात आलेला नाही. शिवाय, या नोटा लवकर खराब होत असल्याने बाजारातून या नोटांचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगण्यात आले..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018