SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता 20 वर्षे फुकट वीज मिळणार..! मोदी सरकारच्या या योजनेत सहभागी व्हा.. असा करा अर्ज..!

घरगुती वीजबिलामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. वीजबिलाच्या नेहमीच्या खर्चातून आता कायमची मुक्ती मिळू शकते नि किमान 20 वर्षे फुकट वीज मिळू शकते.. त्यासाठी मोदी सरकारने खास योजना सुरु केली आहे..

‘सोलार रूफटॉप सबसिडी योजना’ (Solar Rooftop Yojana) असे या योजनेचे नाव आहे.. घराच्या छतावर ‘सोलर रुफटॉप’ बसविल्यास विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी होतो.

Advertisement

‘सोलर पॅनेल’साठी जास्त जागाही लागत नाही. एक किलो वॅट सौरऊर्जेसाठी 10 चौरस मीटर जागा लागते. मोदी सरकार 3 KV पर्यंतच्या सोलार रूफटॉप योजनेसाठी 40 टक्के अनुदान देते, तर 10 KV पर्यंत 20 टक्के अनुदान देते. या योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातूनही माहिती मिळेल.

वीज विकून पैसेही कमावता येणार
2022 पर्यंत देशातील हरित ऊर्जेचे उत्पादन 175 GW पर्यंत नेण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. त्यामुळे सोलर पॅनेल बसविण्यासाठी सरकार मदत करते. घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून घरच्या घरी वीजनिर्मिती करू शकता. जास्त झालेली वीज सरकारला विकून त्यातून पैसेही कमावता येणार आहेत.

Advertisement

कोणत्याही सोलर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षांचे असतं. त्याचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च परवडणारा असतो. फक्त 10 वर्षात एकदा सोलरची बॅटरी बदलावी लागते. त्यासाठी 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जातं. शिवाय सोलरसाठी कर्जही मिळतं. 2 किलो वॅटच्या सोलर पॅनेलमधून 10 तासांत 10 यूनिट वीजनिर्मिती होते. महिन्याला 300 यूनिट वीज. तुम्हाला दरमहा 100 यूनिट वीज लागत असल्यास उर्वरित 200 यूनिट विकून पैसे कमावता येतील.

Advertisement

याेजनेसाठी असा करा अर्ज…
– सर्वात आधी solarrooftop.gov.in वर जा.
– होम पेजवर ‘Solar Roofing‘ साठी अर्जावर क्लिक करा.
– ओपन झालेल्या पेजवर तुमच्या राज्याच्या लिंकवर क्लिक करा.

– तुमच्यासमोर Solar Roof Application चे पेज ओपन होईल.
– त्यावर सगळा अर्ज भरून तो सबमिट करा.
– अशा प्रकारे सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement